बाहेरगावच्या मतदारांची नावे यादीतून कमी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:26 IST2021-02-23T04:26:20+5:302021-02-23T04:26:20+5:30

पालम शहरात नगरपंचायत निवडणूकीचे वातावरण सुरू झाले. मतदार यादीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या मतदार यादीत स्थानिक मतदारा बरोबरच ...

Remove the names of out-of-town voters from the list | बाहेरगावच्या मतदारांची नावे यादीतून कमी करा

बाहेरगावच्या मतदारांची नावे यादीतून कमी करा

पालम शहरात नगरपंचायत निवडणूकीचे वातावरण सुरू झाले. मतदार यादीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या मतदार यादीत स्थानिक मतदारा बरोबरच बाहेरगावच्या मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. ही नावे कमी करावीत, वार्ड रचना गुगल मॅप प्रमाणे करावी, प्रत्येक वार्डात समान मतदार संख्या ठेवावी, प्रत्येक वार्डात मॅप प्रमाणे त्याच वार्डातील मतदारांची नावे समाविष्ट करावेत आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. या निवेदनावर तालुका अध्यक्ष वसंतराव सिरस्कर, लालखा पठाण, कैलास रुद्रवार, दत्ता घोरपडे, सगीर सरवरी, रशीदखा पठाण, दिलीप रोकडे, शेफ चाऊस, रईस खुरेशी, संजय थिटे, विठ्ठल टोम्पे, प्रभाकर सिरस्कर, शेख अकबर, गौतम हत्तीअंबीरे, शरद सिरस्कर, ज्ञानराज घोरपडे, गंगाधर सिरस्कर, हाजी खुरेशी, विलास कोकटे, सदानंद हत्तीअंबीरे आदीच्या सह्या आहेत.

Web Title: Remove the names of out-of-town voters from the list