शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

अहो आश्चर्य ! जोरदार पाऊस झाल्यानंतरही मापकानुसार 'पर्जन्यच' नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 11:39 IST

या प्रकारामुळे पर्जन्यमापकावर शंका उपस्थित केली जात आहे.

पाथरी : दोन गावांमध्ये जोरदार पाऊस झाल्यानंतरही पर्जन्यमापकावर मात्र शून्य नोंद झाल्याने पर्जन्यमापकाविषयी आता शंका निर्माण झाल्या आहेत.

तालुक्यातील पावसाची नोंद घेण्यासाठी महसूल मंडळनिहाय पर्जन्यमापके बसविण्यात आली आहेत. पाथरी तालुक्यामध्ये तीन मंडळ असून तीन ठिकाणी पर्जन्यमापक बसविण्यात आली आहेत. पाथरी मंडळात १३ गावे असून पाथरी शहरातील तहसील कार्यालयात पर्जन्यमापक बसविले आहे. २० जून रोजी रात्री या मंडळातील रेणापूर आणि वाघाळा या दोन गावांच्या शिवारात जोरदार पाऊस झाला. २१ जून रोजी पाथरी येथील पर्जन्यमापकावर या पावसाची नोंद होणे अपेक्षित होते. मात्र या पर्जन्यमापकाने शून्य मि.मी. पावसाची नोंद दर्शविली आहे. या प्रकारामुळे पर्जन्यमापकावर शंका उपस्थित केली जात आहे.

दुष्काळ ठेवण्यासाठी पाऊस महत्त्वाचा घटकमहसूल प्रशासनाने घेतलेल्या पावसाच्या नोंदीवरून जिल्ह्यातील दुष्काळाची आणि नुकसानीची नोंद घेतली जाते. त्यामुळे पर्जन्यमापक हा महत्त्वपूर्ण घटक आहे. मात्र या पर्जन्यमापकद्वारे अचूक नोंदी होत नसतील तर त्याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे.

या पावसाळी हंगामात पाथरी मंडळात दोन वेळा अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे. मात्र प्रत्यक्षात या भागातील पिकांचे कुठलेही नुकसान झाले नाही. तर दुसरीकडे दोन गावात मोठा पाऊस झाला असताना पर्जन्यमापकाने नोंदच घेतली नाही. पर्जन्यमापकाच्या नोंदीतील विसंगतीमुळे शंका  व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Rainपाऊसparabhaniपरभणीagricultureशेती