शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

प्रक्रिया, मूल्यवर्धन केल्यास वाढेल आर्थिक लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:15 IST

परभणी : शेतमालावर प्रक्रिया आणि मूल्यवर्धन केल्यास संबंधित शेतकऱ्यांना निश्चित आर्थिक लाभ वाढेल, असा विश्वास कृषी विद्यापीठाचे शिक्षण संचालक ...

परभणी : शेतमालावर प्रक्रिया आणि मूल्यवर्धन केल्यास संबंधित शेतकऱ्यांना निश्चित आर्थिक लाभ वाढेल, असा विश्वास कृषी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले यांनी व्यक्त केला आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्‍या अन्‍नतंत्र महाविद्यालयातील अन्नप्रक्रिया विभागाच्या वतीने अनुसूचित जाती प्रवर्गातील महिला लाभार्थ्यांसाठी २२ ते २७ मार्च या काळात 'काढणीपश्‍चात तंत्रज्ञान व अन्न प्रक्रिया' या विषयावर प्रशिक्षण घेतले जात आहे. उद्घाटनप्रसंगी डॉ. गोखले बोलत होते. कार्यक्रमास प्राचार्य डॉ. उदय खोडके, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या परभणी जिल्हा समन्वयक नीता अंभोरे, अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान विभागाच्या विभागप्रमुख डॉ. विजया पवार, सुरेंद्र सदावर्ते आदींची उपस्थिती होती.

डॉ. धर्मराज गोखले म्हणाले, पीक काढणीपश्चात बाजारातील आवक वाढल्यामुळे कमी किमतीत शेतकऱ्यांना कच्च्या मालाची विक्री करावी लागते. शेतमालावर प्रक्रिया व मूल्यवर्धन केल्यास निश्चितच आर्थिक लाभ जास्त होऊन उन्नती साधता येते. शेत कामात महिलांचा प्रमुख वाटा असून, त्यांच्या उपजत पीक लागवड ते काढणीपर्यंत सर्व कामे चांगल्या प्रकारे केली जातात. शेतमाल प्रक्रिया व मूल्यवर्धन याचे कौशल्य शेतकरी महिलांनी अवगत करावे, शेतमाल प्रक्रिया उद्योग सुरू करावेत, असा सल्ला डॉ. गोखले यांनी यावेळी दिला.

स्मिता अंभोरे म्हणाल्या, अन्न प्रक्रिया उद्योगांमध्ये महिला सक्षम होत असून, अन्न प्रक्रिया उद्योगासाठी लागणारा कच्चा माल, मनुष्यबळ उपलब्ध असल्यामुळे घरगुती आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करून अन्नप्रक्रिया गृह उद्योग सुरू करता येतील व त्यांच्या निर्यातीसाठी संधी उपलब्ध होतील, असे त्या म्हणाल्या. खोडके यांनीही याप्रसंगी मार्गदर्शन केले. दीपाली गजमल यांनी सूत्रसंचालन केले. सुरेंद्र सदावर्ते यांनी आभार मानले. कार्यक्रमाला डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. हेमंत देशपांडे, दिलीप मोरे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.