शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट एक टक्क्यांपेक्षा कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:14 IST

परभणी : मागील आठवड्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट एक टक्‍क्‍यांपेक्षाही कमी आल्याने पुढील आठवड्यात निर्बंध आणखी सैल केले जाण्याची ...

परभणी : मागील आठवड्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट एक टक्‍क्‍यांपेक्षाही कमी आल्याने पुढील आठवड्यात निर्बंध आणखी सैल केले जाण्याची शक्यता आहे.

राज्यभरात अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यातील आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन व्याप्त खाटांच्या संख्येचा आधार घेऊन अनलॉकचे पाच टप्पे तयार करण्यात आले आहेत. ही प्रक्रिया सुरू झाली तेव्हा परभणी जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या टप्प्यात होता. त्यानंतरच्या ४ ते १० जून या आठवड्यात जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट २.३ टक्क्यांवर पोहोचल्याने मागील आठवड्यात जिल्ह्याचा समावेश अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात होऊन सर्व व्यवहार खुले करण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्यात सर्व व्यवहार नियमित झाले आहेत; मात्र काही निर्बंध अद्यापही आहेत. कोरोना संसर्ग आता आटोक्यात आहे. त्यामुळे पुढील आठवड्यातील व्यवहारासंदर्भात प्रशासनाला निर्णय घ्यावयाचा आहे. ११ ते १८ जून या आठवड्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आणि एकूण तपासण्या लक्षात घेता जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.८३ टक्के झाला आहे. दोन आठवड्यांपूर्वी पेक्षाही हा पॉझिटिव्हिटी रेट कमी असल्याने येत्या सोमवारपासून जिल्ह्यात आणखी निर्बंध कमी केले जाण्याची शक्यता आहे.

११ ते १८ जून या काळात प्रशासनाने २८ हजार ८०२ नागरिकांचे अहवाल तपासले. यामध्ये २४१ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहेत. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.८३ टक्‍क्‍यांपर्यंत कमी झाला आहे. ही बाब जिल्ह्याला दिलासा देणारी आहे. त्यामुळे सोमवारपासून जिल्ह्यात आणखी कोणत्या कोणत्या व्यवहारांना सवलत मिळते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

कोणत्या सेवा होऊ शकतात सुरू

मागील आठवड्यात जिल्ह्यातील बहुतांश सेवा प्रशासनाने सुरू केल्या आहेत; मात्र धार्मिक स्थळे, महाविद्यालय, शाळा, शिकवणी वर्ग, आठवडी बाजार, उद्याने, जलतरण तलाव सुरू करण्यास परवानगी नाही. त्याचप्रमाणे लग्नकार्यासाठी केवळ शंभर जणांच्या उपस्थितीची परवानगी आहे. पॉझिटिव्हिटी रेट कमी झाल्याने या सेवांपैकी कोणती सेवा सुरू करण्यासाठी परवानगी दिली जाऊ शकते, याकडे लक्ष लागले आहे. त्यातही आठवडी बाजार, लग्नकार्यातील नागरिकांच्या उपस्थिती विषयी सकारात्मक निर्णय होईल, अशी आशा आहे.

पथकांना सतर्क करण्याची गरज

पॉझिटिव्हिटी रेट कमी होत असल्याने जिल्ह्यात एकीकडे निर्बंध कमी केले जात असले तरी नागरिकांकडून मात्र प्रतिबंधक नियमांचे पालन होत नाही. बाजारपेठ, बसस्थानक आणि इतर सार्वजनिक ठिकाणी मोठी गर्दी होत आहे. या गर्दीच्या ठिकाणी कोरोना नियमांचे पालन करण्यासाठी प्रशासनाच्या पथकांकडून कडक अंमलबजावणी झाली तर संभाव्य धोका टळू शकतो. त्यामुळे प्रशासनाने पथकांना सतर्क ठेवणे गरजेचे झाले आहे.

मागील आठवड्यातील तपासण्या व रुग्ण

११जून ३१४९ ३३

१२ जून ३९५७ २१

१३ जून २५७० २५

१४ जून ३४३१ ३०

१५ जून ५३७६ ३४

१६ जून २८०६ २१

१७ जून ३२७७ १८

१८ जून ४२३६ ४९