न्याय मिळत नसल्याने पोलिसाचाच आत्महत्येचा प्रयत्न !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 19:11 IST2020-10-05T19:10:25+5:302020-10-05T19:11:21+5:30
पोलीस दलातील भावावर चुकीच्या पद्धतीने कारवाई केल्या प्रकरणी न्याय देण्यात यावा, या मागणीसाठी परभणी महामार्ग विभागातील एका पोलीस कर्मचाऱ्याने विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी दुपारी शहरातील जलतरणिका संकुल परिसरात घडली.

न्याय मिळत नसल्याने पोलिसाचाच आत्महत्येचा प्रयत्न !
परभणी: पोलीस दलातील भावावर चुकीच्या पद्धतीने कारवाई केल्या प्रकरणी न्याय देण्यात यावा, या मागणीसाठी परभणी महामार्ग विभागातील एका पोलीस कर्मचाऱ्याने विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी दुपारी शहरातील जलतरणिका संकुल परिसरात घडली.
परभणी महामार्ग पोलीस विभागातील हवालदार बालाजी लिंबाजी कच्छवे हे सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास जलतरणिका संकुल परिसरात आले व माझ्या भावाविरुद्ध एकही पुरावा नसताना पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, जिंतूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रवण दत्त व पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी संगनमताने भावावर गुन्हा दाखल करून त्याला पोलीस खात्यातून बडतर्फ केले. त्यामुळे कुटुंबाची मानसिक स्थिती खराब झाली असून भावास न्याय मिळावा, यासाठी आपण आत्महत्या करत असल्याचे सांगितले.
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नावाने लिहिलेेले निवेदन हातात घेऊन त्यांनी विषारी द्रव्य प्राशन केले. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या या कर्मचाऱ्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.