शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत दुसऱ्या दिवशीही पिस्तूल व काडतुसे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:08 IST

परभणी : शहरातील संजय गांधीनगर भागात एकाकडून गुरुवारी १ देशी बनावटीचे पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त केल्यानंतर शुक्रवारीही ...

परभणी : शहरातील संजय गांधीनगर भागात एकाकडून गुरुवारी १ देशी बनावटीचे पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त केल्यानंतर शुक्रवारीही परभणी-पाथरी रस्त्यावर एका तरुणाकडून एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूस स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी जप्त केली आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

परभणी-पाथरी रस्त्यावर एका बारच्या परिसरात एका तरुणाकडे गावठी कट्टा असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यावरून स्थागुशाच्या पथकाने शुक्रवारी रात्री ११च्या सुमारास घटनास्थळी धाव घेतली. यावेळी एक तरूण रस्त्याने जात असल्याचे त्यांना दिसले. पथकातील कर्मचाऱ्यांनी या तरूणाची चौकशी करून झडती घेतली असता, त्याच्याजवळ एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूस सापडली. त्याने त्याचे नाव जावेद ख़ान असे सांगितले. त्यानंतर या तरुणाला पकडून परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात आणण्यात आले. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ही कारवाई पोलीस अधीक्षक जयंत मीना व अतिरिक्त पोलीस अधीक्षक मुमका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक बापूराव दडस, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पवार, विश्वास खोले, पोलीस कर्मचारी सुग्रीव केंद्रे, नीलेश भुजबळ, राहुल चिंचाणे, यशवंत वाघमारे, शंकर गायकवाड़, फारुखी, अजहर पटेल, विष्णू भिसे, दीपक मुदिराज, कांबळे यांच्या पथकाने केली.

दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी रात्रीही परभणी शहरातील संजय गांधी नगर भागात भाड्याने राहणारा आरोपी बबलू शेख याच्याकडून एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूस जप्त केली होती. सलग दुसऱ्या दिवशीही एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.