शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
2
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
3
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
4
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
5
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
6
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
7
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
8
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
9
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
10
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
11
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
12
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
13
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
14
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
15
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
16
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
17
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
18
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
19
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
20
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

परभणीत संघाच्या कार्यालयात फेकली पेट्रोलची बॉटल, पुस्तके जळाली; शहरात कडक पोलीस बंदोबस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2018 3:02 PM

भीमा कोरेगाव प्रकरणी पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान बुधवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास काही आंदोलकांनी परभणीत स्टेशनरोडवरील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाच्या खिडकीतून पेट्रोलची बॉटल टाकली. यामध्ये कार्यालयातील काही पुस्तके जळाली. उपस्थित स्वयंसेवकांनी तातडीने आग विझविल्याने पुढील अनर्थ टळला.

ठळक मुद्देपुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव प्रकरणाचे सलग तिस-या दिवशी परभणी  जिल्ह्यात पडसाद उमटले आहेत. दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास शहरातील विविध भागातून आंबेडकरी विचा-यांच्या संघटनांचे कार्यकर्ते रॅलीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात जमले. दुपारी २ वाजेच्या सुमारास स्टेशनरोडवर असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केशव प्रेरणा या कार्यालयाच्या खिडकीतून काही अज्ञातांनी पेट्रोल असलेली बॉटल फेकून दिली.

परभणी : भीमा कोरेगाव प्रकरणी पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान बुधवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास काही आंदोलकांनी परभणीत स्टेशनरोडवरील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाच्या खिडकीतून पेट्रोलची बॉटल टाकली. यामध्ये कार्यालयातील काही पुस्तके जळाली. उपस्थित स्वयंसेवकांनी तातडीने आग विझविल्याने पुढील अनर्थ टळला.

पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव प्रकरणाचे सलग तिस-या दिवशी परभणी  जिल्ह्यात पडसाद उमटले आहेत. सोमवारी दुपारनंतर परभणी शहरातील बाजारपेठ बंद झाल्यानंतर मंगळवारी संपूर्ण जिल्हाभर आंदोलने झाली. जवळपास १७ एस.टी.बसेसवर दगडफेक झाली. अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली. या पार्श्वभूमीवर बुधवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद दरम्यान परभणी शहरातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने सकाळपासूनच बंद होती. दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास शहरातील विविध भागातून आंबेडकरी विचा-यांच्या संघटनांचे कार्यकर्ते रॅलीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात जमले. यावेळी जवळपास दोन तास जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. काही कार्यकर्त्यांनी टायर जाळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी सौम्य लाठीमार करुन जमाव पांगविला. यावेळी स्टेशनरोड परिसरात दगडफेक झाली.

दुपारी २ वाजेच्या सुमारास स्टेशनरोडवर असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केशव प्रेरणा या कार्यालयाच्या खिडकीतून काही अज्ञातांनी पेट्रोल असलेली बॉटल फेकून दिली. यामुळे आतील काही पुस्तके व साहित्य जळाले. आतमधील उपस्थित स्वयंसेवकांनी तातडीने ही आग विझविली व पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोेलीस निरीक्षक संजय हिबारे हे लवाजम्यासह दाखल झाले. तत्पूर्वीच आंदोलक येथून पसार झाले होते. ही घटना समजताच भाजपाच्या अनेक पदाधिका-यांसह कार्यकर्त्यांनी या कार्यालयास भेटी दिल्या. दिवसभर या ठिकाणी पोेलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.

दरम्यान, जिंतूररोडवर जिल्हा परिषद कार्यालयासमोर दुपारी १२ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी रस्त्यावर वाहनांचे टायर जाळले. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या संपूर्ण रस्त्यावर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. वसमतरोडवरील खानापूर फाटा परिसरात दगडफेक व दोन गटात हाणामारीची घटना घडली. या ठिकाणीही तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील अ‍ॅड.अशोक सोनी यांच्या घरावर मंगळवार नंतर बुधवारीही दुपारी १ वाजेच्या सुमारास दगडफेक करण्यात आली. 

जिल्हाभरात कडकडीत बंद

राज्यस्तरावरुन पुकारण्यात आलेल्या बंद अंतर्गत परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागातही कडकडीत बंद दिसून आला. गंगाखेड, जिंतूर, सेलू येथेही बंद होता. मानवत, सेलू येथे सकाळी रास्तारोको करण्यात आला.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारparabhaniपरभणीMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंद