गंगाखेड येथे प्रवाशाची सुट्टे पैसे देण्यावरून वाहकास मारहाण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 18:09 IST2018-04-03T18:09:41+5:302018-04-03T18:09:41+5:30

सुट्टे पैसे देण्याच्या कारणावरून झालेल्या वादात प्रवाशाने वाहकास शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना आज सकाळी दहा वाजता गंगाखेड बस स्थानकात घडली.

passenger attacks on bus conductor on money issue | गंगाखेड येथे प्रवाशाची सुट्टे पैसे देण्यावरून वाहकास मारहाण 

गंगाखेड येथे प्रवाशाची सुट्टे पैसे देण्यावरून वाहकास मारहाण 

गंगाखेड ( परभणी ) : सुट्टे पैसे देण्याच्या कारणावरून झालेल्या वादात प्रवाशाने वाहकास शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना आज सकाळी दहा वाजता गंगाखेड बस स्थानकात घडली. याप्रकरणी वाहकाने दिलेल्या फिर्यादीवरून त्या प्रवाशाविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लातुर ते परभणी जाणारी बस ( क्रमांक एम एच २० बी एल ३९११) सकाळी दहा वाजता गंगाखेड आगारात आली. यावेळी परळी ते गंगाखेड दरम्यान प्रवास करणाऱ्या गौतम रोहिदास जाधव (रा. गंगाखेड) या प्रवाशाने वाहकाकडे तिकिटाचे सुट्ट्या पैस्यांची मागणी करताना त्यांना शिवीगाळ केली. तेंव्हा लातुर आगाराचे वाहक विठ्ठल मस्के यांनी शिवीगाळ करू नको पैसे घे असे म्हणताच जाधव याने त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावरून वाहक मस्के यांनी गंगाखेड पोलीस ठाण्यात जाधव यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुलक्षण शिंदे, मिलिंद जोगदंड हे करत आहेत.

Web Title: passenger attacks on bus conductor on money issue