परभणी : दोन लाख नागरिकांचे सर्व्हेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 11:00 PM2020-03-27T23:00:25+5:302020-03-27T23:00:43+5:30

कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये, या अनुषंगाने जिल्ह्यात अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा स्वयंसेविका यांच्या वतीने सर्व्हेक्षण करण्यात येत असून १८ ते २६ मार्च या कालावधीत जिल्ह्यात २ लाख ७ हजार १८ नागरिकांचे सर्व्हेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. त्यामध्ये २५ हजार १५६ नागरिक देशांतर्गत मोठ्या शहरातून जिल्ह्यात दाखल झाले आहेत. जिल्ह्यातील १ हजार ८२ नागरिकांना श्वसन विकार असल्याचे समोर आले आहे.

Parbhani: Survey of two lakh citizens | परभणी : दोन लाख नागरिकांचे सर्व्हेक्षण

परभणी : दोन लाख नागरिकांचे सर्व्हेक्षण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये, या अनुषंगाने जिल्ह्यात अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा स्वयंसेविका यांच्या वतीने सर्व्हेक्षण करण्यात येत असून १८ ते २६ मार्च या कालावधीत जिल्ह्यात २ लाख ७ हजार १८ नागरिकांचे सर्व्हेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. त्यामध्ये २५ हजार १५६ नागरिक देशांतर्गत मोठ्या शहरातून जिल्ह्यात दाखल झाले आहेत. जिल्ह्यातील १ हजार ८२ नागरिकांना श्वसन विकार असल्याचे समोर आले आहे.
कोरोना प्रादूर्भाव प्रतिबंधात्मक सर्व्हेक्षणांतर्गत जिल्ह्यात १८ मार्चपासून अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा स्वयंसेविका यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील नऊही तालुक्यात सर्व्हेक्षण सुरु करण्यात आले आहे. त्यानुसार २६ मार्चपर्यंत २ लाख ७ हजार १८ नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यामध्ये १ हजार ८२ नागरिकांना श्वसन विकार असल्याचे आढळून आले. त्यामध्ये ताप, कोरडा खोकला व श्वास घेण्यास त्रास होणे आदी बाबींचा समावेश आहे. जिल्ह्यात मोठ्या शहरांमधून २५ हजार १५६ नागरिक दाखल झाले आहेत. त्यामध्ये गंगाखेड तालुक्यात ४ हजार १८, जिंतूर तालुक्यात ५ हजार ७८९, मानवत तालुक्यात २ हजार ५३५, पालम तालुक्यात २ हजार ६५७, परभणी तालुक्यात ३ हजार २२८, पाथरी तालुक्यात २ हजार ६३, पूर्णा तालुक्यात २ हजार ३४३, सेलू तालुक्यात १२, सोनपेठ तालुक्यात १ हजार ७०८ एवढ्या नागरिकांची सर्व्हेक्षणामध्ये नोंद झाली आहे. या व्यतिरिक्तही अनेक नागरिक जिल्ह्यामध्ये दाखल झाले आहेत; परंतु, त्यांची नोंद नाही.
५५९ नागरिकांना दवाखान्यात दाखल होण्याच्या सूचना
४जिल्ह्यातील १ हजार ८२ नागरिकांना श्वसन विकार असल्याचे आढळून आले होते. त्यातील ५५९ नागरिकांना दवाखान्यात उपचार घेण्यासाठी संदर्भित करण्यात आले असल्याची माहिती या संदर्भात देण्यात आलेल्या अहवालात नमूद करण्यात आली आहे.

Web Title: Parbhani: Survey of two lakh citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.