शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
6
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
7
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
8
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
9
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
10
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
11
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
12
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
13
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
14
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
15
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
16
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
17
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
18
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
19
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट

परभणी : ११५ कोटी रुपये खर्चूनही टंचाई हटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 00:22 IST

राज्यातील ग्रामीण भाग कायमस्वरुपी दुष्काळमुक्त करण्याच्या उद्देशाने राबविलेल्या जलयुक्त शिवार अभियान योजनेंतर्गत परभणी जिल्ह्यात चार वर्षामध्ये ११५ कोटी ७ लाख ९६ हजार रुपयांचा खर्च करुन कामे झाली; परंतु, टंचाईग्रस्त गावांची संख्या मात्र कमी होत नसल्याची परिस्थिती आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : राज्यातील ग्रामीण भाग कायमस्वरुपी दुष्काळमुक्त करण्याच्या उद्देशाने राबविलेल्या जलयुक्त शिवार अभियान योजनेंतर्गत परभणी जिल्ह्यात चार वर्षामध्ये ११५ कोटी ७ लाख ९६ हजार रुपयांचा खर्च करुन कामे झाली; परंतु, टंचाईग्रस्त गावांची संख्या मात्र कमी होत नसल्याची परिस्थिती आहे.जलसंधारणाची कामे करुन ग्रामीण भागात शाश्वत पाणीसाठा उपलब्ध करण्याच्या उद्देशाने २०१५ मध्ये राज्य शासनाने या योजनेला प्रारंभ केला. या योजनेंतर्गत प्रत्येक वर्षी टप्प्या टप्प्याने गावांची निवड करुन जलसंधारणाची कामे करण्यात आली. ढाळीचे बांध, सलग समतरचल, मातीनाला बांध, दगडीबांध, शेततळे, सिमेंटनाला बांध, कोल्हापुरी बंधारे, विहीर पूर्नभरण, रिचार्जशाफ्ट, नाला खोलीकरण, गाळ काढणे अशी २१ प्रकारची कामे या योजनेतून करण्यात आली.जिल्ह्यामध्ये २०१५-१६ या वर्षात जलसंधारणाच्या कामावर ४३ कोटी ७४ लाख रुपयांचा खर्च झाला. २०१६-१७ मध्ये ३० कोटी ३९ लाख ६८ हजार रुपयांचा खर्च झाला. २०१७-१८ मध्ये ४० कोटी १९ लाख रुपयांचा खर्च झाला असून या वर्षात योजनेंतर्गत शासनाकडून २० कोटी ९४ लाख रुपये उपलब्ध झाले आहेत. त्यापैकी ७५ लाख २८ हजार रुपयांचा खर्च झाला आहे.४ वर्षांमध्ये ११५ कोटी खर्च करुन जलसंधारणाची कामे करण्यात आली. कागदोपत्री झालेल्या कामांमधुन उपलब्ध पाणीसाठ्याचा लेखाजोखाही घेण्यात आला. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती उलट होत आहे. यावर्षी पाऊस कमी असल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या योजनेत जमा झालेला पाणीसाठा किमान पावसाळा संपल्यानंतर एक-दोन महिने तरी पुरणे अपेक्षित होते; परंतु, सद्यस्थितीत जिल्ह्यामध्ये ४५० गावांत पाणीटंचाईची शक्यता वर्तविण्यात आली आहे.जलसंधारणावर कोट्यवधी रुपयांचा खर्च केल्यानंतरही टंचाईग्रस्त गावांची संख्या कमी होत नसल्याने योजनेच्या अंमलबजावणीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.जिल्हाभरात : चार वर्षांत साडेबारा हजार कामे पूर्णजलयुक्त शिवार अभियानांतर्गत ४ वर्षामध्ये १२ हजार ६८१ जलसंधारणाची कामे पूर्ण झाली आहेत. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार २०१५-१६ मध्ये झालेल्या कामांमुळे ४०४०३.५३ टीएमसी पाणीसाठवण क्षमता झाली. २०१६-१७ मध्ये १८६९७ टीएमसी, २०१७-१८ मध्ये ७२८५ टीएमसी पाणीसाठवण क्षमता निर्माण झाली आहे.जिल्ह्यात चारही वर्षामध्ये ६६३६७.५३ टीएमसी एवढी पाणीसाठवण क्षमता निर्माण झाली असून १ लाख ३२ हजार ७३५ हेक्टर क्षेत्राची एका संरक्षित सिंचनाची सोय झाली असल्याचे म्हटले आहे; परंतु, प्रत्यक्षात यावर्षी निर्माण झालेली स्थिती पाहता सिंचन तर सोडाच पिण्यासाठी पाणी मिळणेही मुश्कील झाले आहे.३४५ गावे जलपरिपूर्णया अभियानांतर्गत २०१५-१६ मध्ये १७०, २०१६-१७ मध्ये १४९ आणि २०१७-१८ मध्ये २६ अशी एकूण ३४५ गावे १०० टक्के जलपरिपूर्ण झाली आहेत. मागील वर्षातील शिल्लक कामे पूर्ण करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली असून यावर्षीची कामे पूर्ण करण्यासाठी पुढील वर्षीच्या मार्च महिन्याची मुदत देण्यात आली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीdroughtदुष्काळIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प