Parbhani: The Purna river along the Yeldari dam is dry | परभणी: येलदरी धरणासह पूर्णा नदी कोरडी
परभणी: येलदरी धरणासह पूर्णा नदी कोरडी

लोकमत न्यूज नेटवर्क
येलदरी (परभणी): पावसाळा सुरू होऊन दीड महिना लोटला असतानाही जिंंतूर तालुक्यातील येलदरी धरण अद्यापही ज्योत्याखाली आहे. त्याचबरोबर या धरणाखाली असलेल्या पूर्णा नदीचे पात्रही भर पावसाळ्यात कोरडेठाक आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासह पिकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मृग नक्षत्र पूर्णत: कोरडे गेले. त्यामुळे यावर्षी मृगनक्षत्रात शेतकऱ्यांच्या पेरण्या झाल्या नाहीत. त्यानंतर २२ जूनपासून आर्द्रा नक्षत्राकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले होते. मात्र या नक्षत्रात देखील पाऊस न पडल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. शेवटी जुलै महिन्यात एका सर्वसाधाण झालेल्या पावसाच्या भरोशावर शेतकºयांनी आपल्या पेरण्या आटोपल्या. मात्र ६ जुलैपासून लागलेल्या पूनर्वसू नक्षत्राने देखील शेतकºयांची निराशा केली. त्यामुळे शेतकºयांचे डोळे सध्या आकाशाकडे लागले आहेत. तीन महत्त्वाचे नक्षत्र संपत आले आहेत. तरीही येलदरी व परिसरात एकही दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकºयांच्या चिंता वाढल्या आहेत.
येलदरी धरणही यावर्षी मृतसाठ्यात असून या परिसरात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे धरणाखालील पूर्णा नदीचे पात्र भर पावसाळ्यात कोरडेठाक असल्यामुळे जनावरांना पिण्यासाठी देखील पाणी शिल्लक नाही. पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला तरी दमदार पाऊस झाला नसल्याने या परिसरातील नदी, नाले, ओढे खळखळून वाहिले नाही. त्यामुळे जनावरांना पाणी पाजावे तरी कोठे? हा प्रश्न पशूपालकांसमोर उभा राहिला आहे. खरीप हंगामात पेरणी केलेले बी उगवले खरे. मात्र पाण्याअभावी हे अंकूर कोमेजून जात आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
तीन कोल्हापुरी : बंधाºयात थेंबही नाही
४येलदरी धरणाखालील पूर्णा नदीच्या पात्रात तीन कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले आहेत. मात्र या बंधाºयात आजमितीस एकही पाण्याचा थेंब शिल्लक नाही. परिणामी या परिसरातील पंचवीसहून अधिक गावातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.
४सध्या या बंधारा पात्रात जे काही पाणी शिल्लक आहे, ते पाणी खराब झाल्यामुळे या पाण्यातून दुर्गंधी येत आहे. त्यामुळे येलदरी परिसरात मुसळधार पाऊस होऊन बंधाºयात नवीन पाणीसाठा तयार होईपर्यंत या परिसरातील शेतकºयांना वाट पहावी लागणार आहे.
२३ दलघमीने कमी झाला पाणीसाठा
४जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणामध्ये १ जूनपर्यंत ११.८३४ दलघमी पाण्याची आवक झाली आहे. सध्या या धरणामध्ये ४४६.०९० मीटर पाणीपातळी आहे. यामध्ये १०१.५५९ दलघमी एकूण पाणीसाठा आहे. ० दलघमी जीवंत पाणीसाठा आहे.
४गतवर्षीच्या तुलनेत १७६ मि.मी. पाऊस कमी झाला आहे. या धरणातील पाणीसाठाही गतवर्षी मृतसाठ्यात होता. यावर्षी तर धरणातील मृत पाणीसाठ्यात देखील २३ दलघमी पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे भविष्यात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
४सध्या तरी या भागातील नागरिक सिंचनासह पिण्याच्या पाण्यासाठी जोरदार पावसाची प्रतीक्षा करीत आहेत.

Web Title: Parbhani: The Purna river along the Yeldari dam is dry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.