शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

परभणी :प्रचार तोफा थंडावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 23:44 IST

१३ दिवसांपासून सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी शनिवारी सायंकाळी ६ वाजता थांबली आहे़ शेवटच्या दिवशी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याच्या उद्देशाने चारही मतदारसंघात उमेदवारांनी मोठे शक्तीप्रदर्शन करीत रॅली काढली़ या रॅलीच्या माध्यमातून उमेदवारांनी मतदारांना आवाहन केले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : १३ दिवसांपासून सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी शनिवारी सायंकाळी ६ वाजता थांबली आहे़ शेवटच्या दिवशी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याच्या उद्देशाने चारही मतदारसंघात उमेदवारांनी मोठे शक्तीप्रदर्शन करीत रॅली काढली़ या रॅलीच्या माध्यमातून उमेदवारांनी मतदारांना आवाहन केले़७ आॅक्टोबर रोजी अंतीम उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील चारही मतदारसंघात प्रत्यक्ष जाहीर प्रचाराला सुरुवात झाली़ हा प्रचार करीत असतानाही उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन केले होते आणि प्रचाराची सांगता करतानाही शक्ती प्रदर्शन करीत रॅली काढण्यात आल्या़ त्यामुळे निवडणुकीचा ज्वर आता शिगेला पोहचला आहे़ १९ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता जाहीर प्रचार थांबला असून, उमेदवार आता मतदारांच्या गाठीभेटी घेवून छुप्या मार्गाने प्रचार करण्याची शक्यता आहे़शनिवारी सकाळपासूनच शहरामध्ये कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती़ प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी रॅली काढत शक्तीप्रदर्शनावर भर दिला़ दुपारी १२ वाजेनंतर शहरातील विविध मार्गावरून रॅलींना सुरुवात झाली़ दिवसभर रॅलींमुळे शहरातील रस्त्यांवर वेगवेगळ्या पक्षांचे झेंडे, बिल्ले झळकत होते़ आपल्या पक्षाचा रुमाल गळ्यात घालून कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झाले होते़ उमेदवारांच्या रॅलीमुळे शहरात निवडणुकीचा ज्वर चढल्याचे दिसून आले़ सायंकाळी ४ वाजेपर्यंत सर्व उमेदवारांच्या रॅली पूर्ण झाल्या़ चारही मतदार संघातील जाहीर प्रचार आता थांबला आहे़ मतदानासाठी आणखी एक दिवसांचा काळ शिल्लक आहे़ या काळात मतदारांच्या गाठीभेटी घेणे आणि वैयक्तीक प्रचारावर भर दिला जाण्याची शक्यता आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019