शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

परभणी महापालिका: ६९ टेबलवर मतमोजणी; दुपारपर्यंत सत्तेचे चित्र होणार स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 10:40 IST

नगरसेवकांच्या ६५ जागांसाठी झाले मतदान...

परभणी : शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक अंतर्गत शहराच्या सत्तेचा फैसला आज(शुक्रवारी) सकाळी १० वाजेपासून होणार असून, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परिसरात ६९ टेबलांवर मतमोजणीस सुरुवात होणार आहे. नगरसेवकांसाठी झालेल्या या निवडणुकीत ४११ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले असून, आज दुपारपर्यंत निकालाचे स्पष्ट चित्र समोर येण्याची शक्यता आहे.

परभणी शहर महानगरपालिकेच्या ६५ नगरसेवकांसाठी गुरुवारी ३४१ मतदान केंद्रांवर मतदान शांततेत पार पडले. रात्री उशिरापर्यंत काही प्रभागांमध्ये मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा दिसून आल्या. या मतदानामुळे निकालात चुरशीचे चित्र दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे, या निवडणुकीत विविध पक्ष व अपक्ष मिळून ४११ उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे प्रत्येक प्रभागातील मतमोजणीवर उमेदवारांसह पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्याचे बारकाईने लक्ष असणार आहे. 

गुरुवारी रात्री उशिरापर्यंत सर्व ईव्हीएम प्रशासनाच्या वतीने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील स्ट्रॉग रूममध्ये जमा करून सील करण्यात आल्या असून, या ठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या मतमोजणीसाठी प्रशासनाने तयारी केली असून, एकूण ६९ टेबलांवर २७६ अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. रात्री उशिरापर्यंत स्ट्रॉग रुममध्ये ईव्हीएम मशीन दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

मतमोजणीची प्रक्रिया ५ ते ७फेऱ्यांमध्ये पार पडणार असून, प्रत्येक फेरीनंतर आकडेवारीची अधिकृत नोंद घेण्यात येणार आहे. ईव्हीएममधील मतांची मोजणी करताना निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन केले जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

प्रत्येक फेरीअंती अधिकृत आकडे होणार जाहीर

मतमोजणीदरम्यान स्ट्रांग रूम उघडण्यापासून ते अंतिम निकाल जाहीर होईपर्यंत निरीक्षक, निवडणूक अधिकारी, पोलिस प्रशासन व उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. निकाल जाहीर करताना प्रत्येक फेरीअंती अधिकृत आकडे जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक प्रशासनाने बुधवारी दिली.

कोणाचा झेंडा फडकणार ...

शुक्रवारी दुपारपर्यंत परभणी शहर महानगरपालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार आणि कोणत्या पक्षाला विरोधी बाकांवर बसावे लागणार, याचे स्पष्ट चित्र समोर येण्याची शक्यता आहे. निकालाकडे शहरासह जिल्ह्याचे लक्ष लागले असून, राजकीय हालचालींना वेग आला आहे.

अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात

मतमोजणी प्रक्रियेमुळे शुक्रवारी शहरातील काही भागात वाहतूक निर्बंध लागू करण्यात आले असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतमोजणीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी नियंत्रण कक्षही कार्यान्वित करण्यात आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Parbhani Municipal Election: Counting on 69 Tables, Results Expected by Afternoon

Web Summary : Parbhani municipal election counting starts at 10 AM on 69 tables. Results for 65 seats, with 411 candidates, expected by afternoon. Tight security in place.
टॅग्स :Parbhani Municipal Corporation Electionपरभणी महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६Local Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५