परभणी : गंगापूर धरणात अडविलेले ६०० दलघमी पाणी सोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 00:52 IST2018-11-05T00:52:08+5:302018-11-05T00:52:27+5:30
उर्ध्व धरणातून ९ टीएमसी पाणी जायकवाडी धरणात सोडण्याच्या दिलेल्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करून गंगापूर धरणाचे बंद केलेले दरवाजे उघडून ६०० दलघमी पाणी जायकवाडी धरणात सोडण्यात यावे, अशी मागणी भारतीय किसान सभेच्या वतीने २ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांमार्र्फत मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

परभणी : गंगापूर धरणात अडविलेले ६०० दलघमी पाणी सोडा
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : उर्ध्व धरणातून ९ टीएमसी पाणी जायकवाडी धरणात सोडण्याच्या दिलेल्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करून गंगापूर धरणाचे बंद केलेले दरवाजे उघडून ६०० दलघमी पाणी जायकवाडी धरणात सोडण्यात यावे, अशी मागणी भारतीय किसान सभेच्या वतीने २ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांमार्र्फत मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
उर्ध्व धरणातून सोडण्यात आलेले ९ टीएमसी पाणी गंगापूर व पालखेड धरणात अडविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जायकवाडी धरणात सोडण्यात येणाºया पाण्याच्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली आहे. मराठवाड्याच्या हक्काचे पाणी देण्यास विरोध केला जात असून, या प्रश्नी तत्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर कॉ. विलास बाबर, कॉ. प्रभाकर जांभळे, कॉ. बाबासाहेब पवार, कॉ. राजेभाऊ राठोड, कॉ.सटवाजी गोरे, पांडुरंग पवार, काशिनाथ शिंदे, गणेश लोखंडे, पंढरी बाबर, बबन पवार, कपील धूमाळ, कैलास थावरे, भास्कर खुपसे आदींच्या स्वाक्षºया आहेत.