परभणी : ‘जायकवाडी’ भरल्याने वाढल्या आशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 12:48 AM2019-09-17T00:48:53+5:302019-09-17T00:49:24+5:30

जायकवाडी प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असल्याने या प्रकल्पातून गोदावरी नदीपात्रात २ हजार क्युसेस पाणी सोडले जात आहे. या पाण्याच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यातील चारही बंधारे १०० टक्के भरुन घेण्याची मागणी होत आहे. तेव्हा पाटबंधारे विभाग या संदर्भात काय निर्णय घेते, याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.

Parbhani: 'Jaikwadi' filled with increased hopes | परभणी : ‘जायकवाडी’ भरल्याने वाढल्या आशा

परभणी : ‘जायकवाडी’ भरल्याने वाढल्या आशा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जायकवाडी प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असल्याने या प्रकल्पातून गोदावरी नदीपात्रात २ हजार क्युसेस पाणी सोडले जात आहे. या पाण्याच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यातील चारही बंधारे १०० टक्के भरुन घेण्याची मागणी होत आहे. तेव्हा पाटबंधारे विभाग या संदर्भात काय निर्णय घेते, याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.
पैठण तालुक्यातील जायकवाडी प्रकल्पामध्ये पाण्याची आवक सुरु झाली असून हा प्रकल्प ९८ टक्के भरला आहे. त्यामुळे प्रकल्पातून डाव्या आणि उजव्या कालव्याबरोबरच गोदावरी नदीपात्रातही पाणी सोडले जात आहे. सोमवारी सकाळी जायकवाडी प्रकल्पातून २ हजार क्युसेस पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आले. पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरु झाला असून साधारणत: दोन दिवसांमध्ये हे पाणी परभणी जिल्ह्यात दाखल होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात गोदावरी नदीवर मुद्गल, तारुगव्हाण, ढालेगाव, मुळी आणि डिग्रस हे पाच बंधारे बांधले आहेत. त्यापैकी तारुगव्हाण बंधाऱ्याचे काम अजून शिल्लक असल्याने या बंधाºयात पाणीसाठा होत नाही. मात्र पाथरी तालुक्यातील मुद्गल आणि ढालेगाव या दोन बंधाºयात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करणे शक्य आहे. तसेच पालम तालुक्यातील डिग्रस उच्च पातळीतील बंधाºयातही पाणीसाठा करणे शक्य आहे. दीड महिन्यापूर्वी नगर, नाशिक जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसामुळे जायकवाडी प्रकल्पातील उर्ध्वभागातील प्रकल्प १०० टक्के भरल्याने जायकवाडीत पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यावेळी जायकवाडी प्रकल्पातून परभणी जिल्ह्यातील बंधारे पूर्ण क्षमतेने भरणे अपेक्षित असताना केवळ पिण्याच्या पाण्याच्या आरक्षणा एवढेच पाणी बंधाºयामध्ये साठविण्यात आले. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असला तरी सिंचनाचा प्रश्न कायम आहे.
१५ सप्टेंबर रोजी जायकवाडी प्रकल्प पुन्हा एकदा ९८ टक्के भरला असून या प्रकल्पातून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडले जात आहे. त्यामुळे आता या पाण्याचे राजकारण न करता जिल्ह्यातील चारही बंधारे पाण्याने भरुन घेण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहेत. जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने पाण्याची स्थिती गंभीर आहे. अशा परिस्थितीत गोदावरी नदीवर बांधलेले बंधारे जिल्ह्यासाठी वरदान ठरु शकतात. बंधाऱ्यांमध्ये पूर्णक्षमतेने पाणीसाठा झाला तर बंधारा परिसरातील शेकडो गावांमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसेच सिंचनाचा प्रश्न निकाली निघू शकतो. त्यामुळे जिल्ह्याची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता, जिल्ह्यातील सर्व बंधारे पाण्याने १०० टक्के भरुन घ्यावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
बंधाºयांमध्ये : २५ टक्केच पाणीसाठा
४पाथरी तालुक्यातील ढालेगाव बंधाºयावर पाथरी शहरासाठी पिण्याच्या पाण्याचे आरक्षण नोंदविले आहे. १६ दलघमी क्षमतेचा हा बंधारा असून सद्यस्थितीला बंधाºयात केवळ ३.१५ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे.
४याच तालुक्यातील मुद्गल बंधाºयातून सोनपेठ शहराला पाणी दिले जाते. त्यासाठी २.८५ दलघमी पाण्याचे आरक्षण करण्यात आले आहे. १४ दलघमी क्षमतेचा हा बंधारा असून सध्या बंधाºयात ३.२५ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे.
४तर पालम तालुक्यातील डिग्रस हा जिल्ह्यात सर्वात मोठा ६४ दलघमी क्षमतेचा बंधारा आहे. मात्र या बंधाºयात केवळ १२ दलघमी पाणीसाठा करण्यात आला आहे. प्रत्यक्षात मागील वेळेस बंधारे पाण्याने पूर्ण क्षमतेने भरुन घेणे आवश्यक होते.
४ त्यावेळी केवळ पिण्यापुरताच पाणीसाठा करण्यात आला. आता यावेळी दुसºयांदा नदीपात्रात पाणी सोडले जात असल्याने हे बंधारे १०० टक्के भरुन घेतले तर पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागणार आहे.

Web Title: Parbhani: 'Jaikwadi' filled with increased hopes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.