शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

परभणी : पाच भंगार विक्रेत्यांविरूद्ध एटीएसने दाखल केले गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 12:24 AM

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार भंगार साहित्याच्या खरेदी-विक्रीच्या नोंदी न ठेवणाºया शहरातील ५ भंगार विक्रेत्यांविरुद्ध दहशतवाद विरोधी पथकाने गुन्हे दाखल केले आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार भंगार साहित्याच्या खरेदी-विक्रीच्या नोंदी न ठेवणाºया शहरातील ५ भंगार विक्रेत्यांविरुद्ध दहशतवाद विरोधी पथकाने गुन्हे दाखल केले आहेत़पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील नेट कॅफे, लॉज, भंगार विक्रेते यांच्या तपासण्या दहशतवाद विरोधी पथकाकडून केल्या जात आहेत़ राष्ट्रविघातक, सामाजिक घातक कृत्यांना आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी घरमालक, भाडेकरू, लॉज मालक, सायबर कॅफे मालक, मोबाईल सीम विक्रेते, भंगार विक्रेते, आॅफसेट चालक, विस्फोटक गोदाम परवानाधारक यांना दररोज रजिस्टरमध्ये नोंदी करण्याचे बंधन घातले आहे़ त्यानुसार दररोज नोंदी करणे आवश्यक आहे़ भंगार विक्रेत्यांनी त्यांच्या स्क्रॅब दुकानात आलेला माल, कोणता माल आला, कोणी दिला तसेच हा माल विक्री केल्यानंतर तो कुठे विक्री केला? याच्या नोंदी ठेवणे आवश्यक आहे़ वारंवार सूचना देऊनही या नोंदी न ठेवल्याने दहशतवाद विरोधी पथकाने जिल्हाधिकाºयांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून ताज स्क्रॅब सेंटर, एचकेजीएन स्क्रॅब सेंटरच्या मालकांविरूद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात आणि रियाज स्क्रॅब सेंटरचे मालक रियाज अहमद, बिलाल स्क्रॅब सेंटरचे मालक मो़ अकबर अली व बाबा डिस्पोजल स्क्रॅब सेंटरच्या मालकाविरूद्ध नानलपेठ पोलीस ठाण्यात भादंवि कलम १८८ प्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत़ ही कारवाई दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विश्वास खोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक शेख इब्राहीम, भारत नलावडे, दत्तात्रय चिंचाणे, अजहर पटेल, आरेफ कुरेशी, दीपक मुदीराज यांनी केली आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारीcollectorजिल्हाधिकारी