परभणी:१७७ कोटींचे पीककर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 12:33 AM2019-07-30T00:33:16+5:302019-07-30T00:33:41+5:30

जिल्ह्यातील बँकांनी २६ जुलैपर्यंत केवळ ३४ हजार ५४७ शेतकऱ्यांना आतापर्यंत १७७ कोटी ५८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले असून, खरीपाचा हंगाम संपत आला तरी कर्जवाटपाचे उद्दीष्ट १३ टक्क्यांपेक्षा अधिक वाढत नसल्याने बँकांची उदासिनता दिसून येत आहे.

Parbhani: Allocation of Rs | परभणी:१७७ कोटींचे पीककर्ज वाटप

परभणी:१७७ कोटींचे पीककर्ज वाटप

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील बँकांनी २६ जुलैपर्यंत केवळ ३४ हजार ५४७ शेतकऱ्यांना आतापर्यंत १७७ कोटी ५८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले असून, खरीपाचा हंगाम संपत आला तरी कर्जवाटपाचे उद्दीष्ट १३ टक्क्यांपेक्षा अधिक वाढत नसल्याने बँकांची उदासिनता दिसून येत आहे.
परभणी जिल्ह्यात खरीप हंगाम हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जातो. मागील वर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकºयांच्या हाती उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे यावर्षी खरीप पिकांच्या पेरण्यांसाठी हातात पैशांची आवश्यकता असताना बँकांनी मात्र आखडता हात घेतला आहे. जिल्हा प्रशासनाने मार्च महिन्यातच जिल्ह्यातील बँकांना खरीप हंगामात वाटप करावयाचे उद्दीष्ट निश्चित करुन दिले आहे. त्यामुळे जुलै अखेरपर्यंत बँकांनी दिलेले उद्दीष्ट पूर्ण करणे अपेक्षित असताना २६ जुलैपर्यंत जिल्ह्यात केवळ १२.८ टक्के पीक कर्जाचे वाटप झाले आहे.
जिल्ह्यात खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पिके वाढीस लागली आहेत. पेरणीसाठीच शेतकºयांना पैशांची आवश्यकता भासते. मात्र बँकांना उद्दीष्ट देऊनही वेळेत कर्ज वाटप झाले नाही. त्यामुळे शेतकºयांना पीक कर्ज वाटपाचा कुठलाही फायदा झाला नाही. शेतकºयांनी खाजगी सावकारांचे दारे ठोठावून पैसा जमा केला. जर शासकीय योजनांचा लाभ वेळेत मिळत नसेल तर उपयोग काय? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील बँकांना १४७० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट निश्चित करुन दिले आहे. मात्र त्या तुलनेत वाणिज्य बँकांनी केवळ ४ हजार ३२७ शेतकºयांना ४९ कोटी २६ लाख रुपये, खाजगी बँकांनी १ हजार ३३१ शेतकºयांना २० कोटी ५२ लाख रुपये, महाराष्टÑ ग्रामीण बँकेने ३ हजार २०२ शेतकºयांना २५ कोटी ४३ लाख रुपये आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २५ हजार ६८७ शेतकºयांना ८२ कोटी ३७ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. विशेष म्हणजे, आता खरीप हंगाम जवळपास संपत आला आहे. परंतु बँकांनी अद्यापपर्यंत पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट पूर्ण केले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जिल्हाधिकाºयांनी याकडे लक्ष देऊन बँकांचे उद्दीष्ट पूर्ण करुन घेण्यासाठी सूचना कराव्यात व शेतकºयांना वेळेत पैसा उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी होत आहे.
जिल्हा बँकेतून सर्वाधिक कर्ज वाटप
च्जिल्ह्यातील सर्वच बँकांना पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट ठरवून दिले असताना कर्ज वाटपासाठी केवळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पुढाकार घेतल्याचे दिसत आहे.
च् जिल्हा बँकेने दिलेल्या उद्दीष्टाच्या तुलनेत ४८.७८ टक्के कर्ज वाटप केले आहे. खाजगी बँकांनी ३९.११ टक्के कर्ज वाटप केले असून, महाराष्टÑ ग्रामीण बँकेने १२.७१ टक्के कर्ज वाटप केले आहे. तर वाणिज्य बँकांनी केवळ ४.६८ टक्के कर्ज वाटप केले आहे.
च्बँकांचा कर्ज वाटपाचा आकडा पाहता पीक कर्ज वाटपाचे काम अतिशय संथगतीने होत असल्याचे दिसत आहे. कर्ज वाटपाची गती वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
च्बँकांनी वेळेत पीक कर्ज दिले तर पिकांवरील फवारणी, खत, कीटकनाशकांच्या खरेदीसाठी हा पैसा शेतकºयांना उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे पीक कर्जाची मागणी होत आहे.
कर्जमाफीचा घोळ कायमच
च्राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शेतकºयांचे दीड लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ केले होते. तसेच दीड लाख रुपयांवरील कर्जाची रक्कम भरुन लाभार्थी शेतकºयांना योजनेचा लाभ दिला होता. असे असताना कर्जमाफीचा घोळ अजूनही मिटला नसल्याचे दिसून येत आहे. कर्ज मागण्यासाठी शेतकरी बँकेत गेल्यानंतर अनेक शेतकºयांना तुमचे पूर्वीचे कर्ज माफ झाले नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नवीन कर्ज दिले जात नाही. त्यामुळे कर्ज माफी मिळाली की नाही, याची माहिती शेतकºयांनाही मिळत नसल्याने योजनेचा घोळ दोन वर्षानंतरही कायम आहे.
पीक कर्ज पुनर्गठनास टाळाटाळ
च्मागील वर्षीच्या कर्जाचे पुनर्गठन करुन नवीन कर्ज उपलब्ध करुन द्यावे, अशी अनेक शेतकºयांची मागणी आहे. मात्र कर्जाचे पुनर्गठन करण्यासही बँका टाळाटाळ करीत आहेत. बँकांच्या या भूमिकेविरुद्ध शेतकरी संघटना तसेच शेतकºयांनी अनेक वेळा आंदोलने केली. मात्र तरीही शेतकºयांना न्याय मिळत नसल्याचे दिसत आहे. बँकांनी कर्जाचे पुनर्गठन करुन घ्यावे, अशी मागणी होत आहे.

Web Title: Parbhani: Allocation of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.