शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : दीड महिन्यांत ७० डेंग्यू संश्यित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 00:27 IST

महानगरपालिकेच्या नागरी हिवताप विभागाने दीड महिन्याच्या काळात केलेल्या सर्वेक्षणात डेंग्यू संशयित तापीने ग्रासलेल्या ७० रुग्णांची माहिती प्राप्त झाली असून, या परिसरातील एकूण १५३ जणांचे रक्तजल नमुने सामान्य रुग्णालयात तपासणीसाठी पाठविले होते. त्यातील एका रुग्णास डेंग्यूची लागण झाल्याचा अहवाल मनपाला प्राप्त झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महानगरपालिकेच्या नागरी हिवताप विभागाने दीड महिन्याच्या काळात केलेल्या सर्वेक्षणात डेंग्यू संशयित तापीने ग्रासलेल्या ७० रुग्णांची माहिती प्राप्त झाली असून, या परिसरातील एकूण १५३ जणांचे रक्तजल नमुने सामान्य रुग्णालयात तपासणीसाठी पाठविले होते. त्यातील एका रुग्णास डेंग्यूची लागण झाल्याचा अहवाल मनपाला प्राप्त झाला आहे.परभणी शहर व परिसरात तापीची साथ पसरल्याने महानगरपालिकेच्या नागरी हिवताप योजनेअंतर्गत शहरात २३ आॅगस्ट ते १६ आॅक्टोबर या दीड महिन्यांच्या काळात सर्वेक्षण करण्यात आले. घरोघरी जाऊन कंटेनरची तपासणी करण्यात आली. त्यात एकूण ३ हजार ९८३ घरांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ३१७ घरे दूषित असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचप्रमाणे ठिकठिकाणी तपासलेल्या ३ हजार ४११ कंटनेरपैकी ३४७ कंटेनर दूषित असल्याची माहिती नागरी हिवताप योजना कार्यालयातील जीवशास्त्रज्ञ विनय मोहरीर यांनी दिली.दूषित असलेल्या ३४७ कंटेनरपैकी ३०८ कंटेनरमध्ये डास अळीनाशक औषधी टाकण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ३९ कंटेनरमधील पाणी काढून देण्यात आले. ३०२ घरांमध्ये व परिसरात धूर फवारणी करण्यात आली. २८ आॅगस्ट ते ५ आॅक्टोबर या काळात शहरातील १६ प्रभागांमध्ये धूर फवारणीची पहिली फेरी पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती मनपाने दिली.

टॅग्स :parabhaniपरभणीdengueडेंग्यू