Parabhani: हातपाय धुण्यासाठी गेला अन् दुधना नदीत तोल जाऊन पडला; तरुणाचा दुर्दैवी अंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 13:05 IST2025-10-06T13:05:12+5:302025-10-06T13:05:26+5:30
दुधना नदीच्या पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू, परभणी तालुक्यातील झरी येथील घटना

Parabhani: हातपाय धुण्यासाठी गेला अन् दुधना नदीत तोल जाऊन पडला; तरुणाचा दुर्दैवी अंत
झरी (जि. परभणी) : दुधना नदीकाठावर हातपाय धुण्यासाठी गेलेल्या मानवत तालुक्यातील राजुरा येथील एका ३५ वर्षीय तरुणाचा पाण्यात वाहत जाऊन मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी परभणी तालुक्यातील झरी नदीपात्रात उघडकीस आली.
तुकाराम बालासाहेब निर्वळ (वय ३५, रा. राजुरा तालुका मानवत) असे मयताचे नाव आहे. बालासाहेब निर्वळ यांनी खबर दिली. तुकाराम निर्वळ हा राजुरा येथील दुधना नदीच्या काठावर हातपाय धुण्यासाठी गेला होता. यादरम्यान तोल जाऊन नदीच्या पाण्यात पडून प्रवाहात वाहून गेला. हा प्रकार ३ ते ५ ऑक्टोबरदरम्यान घडला. रविवारी सकाळी परभणी तालुक्यातील झरी शिवारातील दुधना नदीपात्रात त्याचा मृतदेह तरंगताना आढळून आला.
घटनेची माहिती परभणी ग्रामीण पोलिसांना कळतात घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी बालासाहेब निर्वळ यांच्या खबरीवरून परभणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. याप्रकरणी सपोनि. जीवन राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली झरीचे बीट जमादार शंकर हाके तपास करीत आहेत. येथे विविध यंत्रणांनी रेस्क्यू केला. त्यावेळी बघ्यांची गर्दी झाली होती.