शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

Parabhani: रस्ता नसल्याने गरोदर मातेची बैलगाडीतून फरफट; 'आई वाचली, पण बाळ दगावले!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 12:39 IST

स्वातंत्र्यापासून रस्ता नाही, सेलू तालुक्यातील बोथ तांडा येथील प्रकार

सेलू (जि. परभणी) : देशास स्वातंत्र्य मिळून ७८ वर्ष लोटले तरी अनेक गावांना रस्ता नाही. याला प्रशासनाची अनास्था म्हणावी की, राज्यकर्त्यांचा निष्काळजीपणा. हा प्रश्न सेलू तालुक्यातील बोथ तांडा येथील घटनेमुळे पुन्हा एकदा पुढे आला आहे. रस्ता, पुलाअभावी प्रसूतीवेदनेत गरोदर महिलेला खस्ता खात बैलगाडीतून प्रवास करावा लागला. आरोग्य परिचारिकेच्या धैर्यामुळे त्या महिलेचे प्राण तर वाचले, पण बाळ दगावले. ही हृदयद्रावक घटना गुरुवारी घडली. यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

बोथ तांडा येथील कल्पना अमोल चव्हाण यांना गुरुवारी पहाटे प्रसूतीवेदना सुरू झाल्या. गावाला जोडणारा दीड किलोमीटर रस्ता नसल्याने ना कोणते वाहन गावात पोहचू शकते, ना रुग्णवाहिका. नाइलाजाने या महिलेस बैलगाडीने वाई गावापर्यंत नेले. तेथून खासगी वाहनाने राव्हा आरोग्य उपकेंद्रात दाखल केले. उपकेंद्रातील आरोग्य परिचारिका सुजाता गायकवाड यांनी तत्काळ उपचार सुरू केले. बाळाभोवतीचे पाणी निघून गेले होते, तर अल्ट्रासाउंडमध्ये बाळाचे हृदय थांबलेले आढळले. तरीही धैर्याने परिचारिका गायकवाड यांनी प्रसूती करून कल्पना चव्हाण यांचे प्राण वाचवले. मात्र, गर्भातील बाळाचा मृत्यू झाला. आणखीन काही मिनिटांचा उशीर झाला असता तर आईचेही प्राण धोक्यात आले असते, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. नऊ महिने आईच्या उदरात सुरक्षित असलेले बाळ मात्र व्यवस्थेच्या दुर्लक्षामुळे दगावले. या घटनेमुळे संताप व्यक्त होत असून, ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

निवेदन, मागण्यांकडे प्रशासन, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
बोथ आणि बोथ तांडामध्ये सुमारे तेराशे लोकसंख्या असून, ५३० मतदार आहेत. करपरा नदीवर पूल आणि गावाला जोडणारा दीड किमी रस्ता स्वातंत्र्य काळापासूनच झालाच नाही. पावसाळ्यात गावाचा संपर्क तुटतो. त्यामुळे विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. यामुळे रस्त्यासाठी ग्रामस्थांनी मागील अनेक वर्षांत जि. प., आमदार, खासदारांसह पालकमंत्र्यांनाही अनेकदा निवेदन देऊन मागणी केली, पण याचा उपयोग झाला नाही, असे सचिन राठोड यांनी सांगितले.

रस्त्यासाठी निवडणुकीवर बहिष्कार घातला होता
बोथ व बोथ तांडा गाव चिकलठाणा बु. गट व गणात येते. येथील निडणुकीत ग्रामस्थांनी एकत्र येऊन बहिष्कार टाकल्या बाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना या घटनेपूर्वीच दिले होते. या घटनेमुळे आता गावात शोककळा पसरली असून, संतापाची लाट उसळली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Parbhani: No road, pregnant woman's ordeal; baby dies, mother survives.

Web Summary : Due to a lack of roads in Both Tanda, a pregnant woman endured a harrowing bullock cart journey. While the mother survived, the baby tragically died. Villagers express outrage over administrative neglect.
टॅग्स :pregnant womanगर्भवती महिलाparabhaniपरभणी