शहरं
Join us  
Trending Stories
1
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
2
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
3
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
4
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
5
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
6
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
7
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
8
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
9
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
10
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
11
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
12
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
13
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
14
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
15
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
16
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
17
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
18
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
19
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
20
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

Parabhani: सज्ज व्हा, उद्यापासून मिळणार महापौर, उपमहापौरपदासाठी नामनिर्देशन पत्र

By राजन मगरुळकर | Updated: January 29, 2026 19:22 IST

विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या आदेशानुसार मनपाच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणुकीची विशेष सभा पिठासीन अधिकारी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

परभणी : महापौर आणि उपमहापौरपदासाठीच्या इच्छूकांना ३० जानेवारी ते ३ फेब्रुवारीपर्यंत नामनिर्देशन पत्र वितरित केले जाणार आहेत. तर हे नामनिर्देशन पत्र ३ फेब्रुवारीला सकाळी दहा ते सायंकाळी ५.४५ पर्यंत मनपाच्या प्रभारी नगरसचिव यांच्या कार्यालयात स्विकारले जाणर आहेत. याच ठिकाणी हे अर्ज मिळणार आहेत. त्यामुळे आजपासून या निवडीची रणधूमाळी सुरु होणार आहे.

विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या आदेशानुसार मनपाच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणुकीची विशेष सभा पिठासीन अधिकारी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. त्यानुसार निवडणुकीचा पुढील कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी घोषित केला. ज्यामध्ये ३० जानेवारी ते दोन फेब्रुवारी दरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ५.४५ पर्यंत तर ३ फेब्रुवारीला सुद्धा सकाळी दहा ते दुपारी तीन पर्यंत हे नामनिर्देशन पत्र वितरित होणार आहेत. नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यासाठी ३ फेब्रुवारीला सकाळी दहा ते सायंकाळी ५.४५ पर्यंत कालावधी निश्चित केला आहे. महापालिकेच्या इमारतीतील प्रभारी नगरसचिव यांच्याकडे सदरील नामनिर्देशन पत्र मिळणार असून याच ठिकाणी ते ३ फेब्रुवारी अंतिम तारखेपर्यंत स्वीकारले जाणार आहेत.

विशेष सभा सुरू झाल्यावर छाननी...
९ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता बी.रघुनाथ सभागृहात विशेष सभा आयोजित केली आहे. पिठासीन अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली या सभेमध्ये नामनिर्देशन पत्राची छाननी होणार आहे. छाननीअंती वैध उमेदवारांची नावे पिठासीन अधिकारी हे घोषित करतील. यानंतर पंधरा मिनिटाच्या कालावधीत लेखी नोटीस देऊन उमेदवारी मागे घेता येणार आहे व त्यानंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची नावे घोषित करून हातवर करून मतांची नोंद घेण्यात येणार आहे.

स्वत:ला दाखल करावे लागणार नामनिर्देशन
नामनिर्देशन पत्र, ओळखपत्राची सत्यप्रत निवडणूक लढविणाऱ्या निर्वाचित पालिका सदस्य यांना स्वतः दाखल करावी लागणार आहे. महापौर आणि उपमहापौर पदासाठी प्रत्येक उमेदवारास चारपेक्षा अधिक नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार नाहीत. या पदासाठी कोणत्याही पालिका सदस्यास एकापेक्षा अधिक उमेदवाराची नामनिर्देशन पत्रे सूचित करता येणार नाहीत किंवा त्यास अनुमोदनही देता येणार नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Parbhani: Nomination for Mayor, Deputy Mayor Posts to Begin Tomorrow

Web Summary : Parbhani's mayoral election process starts tomorrow. Nomination papers will be distributed from January 30th to February 3rd and accepted until February 3rd. The special meeting for election is on February 9th.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Parbhani Municipal Corporation Electionपरभणी महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६