शहरं
Join us  
Trending Stories
1
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगालमध्ये आणखी एका भाजपा उमेदवाराच्या कारवर हल्ला
3
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
4
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, फोडल्या काचा
5
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
6
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
7
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
8
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
9
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
10
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
11
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
12
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
13
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
14
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
15
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
16
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
17
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
18
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
19
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
20
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
Daily Top 2Weekly Top 5

'अडचणीवर मात केली आणि सेंद्रिय शेतीच केली'; बाबासाहेब रणेर यांना कृषीभूषण पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 19:24 IST

महाराष्ट्र शासनाकडून शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना दिला जाणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा झाली आहे.

पाथरी : तालुक्यातील बाभळगाव  येथील प्रगतशील शेतकरी बाबासाहेब   तात्यासाहेब रणेर यांना महाराष्ट्र शासनाचा 2018 चा कृषीभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने बुधवारी याची माहिती दिली. राज्यात कृषी कृषी संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. 

महाराष्ट्र शासनाकडून शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना दिला जाणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा झाली आहे. यामध्ये पाथरी तालुक्यातील बाभळगाव येथे आपल्या शेतात सेंद्रिय पद्धतीने शेती करणाऱ्या बाबासाहेब तात्याराव रणेर यांना २०१८ साठी सेंद्रियशेती गटात कृषिभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे .बाबासाहेब रणेर यांना बाभळगाव शिवारामध्ये एक हेक्टर जमीन आहे. यामध्ये ते  ऊस , सोयाबीन पिके सेंद्रिय पद्धतीने घेत असतात. रणेर यांनी २०११ - १२ मध्ये भरतेश्वर शेतकरी गटाची स्थापना केली. या माध्यमातून त्यांनी काकडी ,मिरची  व सघन पद्धतीने कापूस लागवड इत्यादी प्रयोग केले. यातून  गटातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले. या कार्यासाठी २०१३ - १४ चा प्रकल्प आत्माकडून दिला जाणारा उत्कृष्ट गटाचा पुरस्कारही त्यांना मिळाला होता.

यानंतर त्यांनी २० शेतकऱ्यांना घेत झिरो बजेट नैसर्गिक शेती प्रशिक्षण शिबीर याद्वारे सेंद्रिय शेतीसाठीचे प्रशिक्षण घेतले. पुढे चालून या सर्वांनी मिळून सेंद्रिय शेती करण्यास सुरुवात केली. यासाठी त्यांनी गोवर्धन सेंद्रिय गटाची स्थापना केली आहे. गटामुळे त्यांना एकत्रित  प्रशिक्षण व अभ्यास दौरे यांच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठा  व तंत्रज्ञान शिकण्यासाठी मदत झाली. त्यांनी स्वतः गटातील शेतकऱ्यांना गांडूळ युनिट उभारणीसाठी पुढाकार घेत मदत केली. जीवामृत ,बीजामृत व दशपर्णी अर्क इत्यादी सेंद्रिय शेती साठी आवश्यक बाबींचा ते स्वतःच्या शेतीमध्ये वापर करत असतात. यातून अडीच एकर क्षेत्रात कमी गुंतवणुकीतून आधीचा नफा त्यांना मिळाला लागला आहे. हीच गोष्ट त्यांनी इतर शेतकऱ्यांच्या शेतावर राबवल्याने त्यांच्याही उत्पादनात आता वाढ झाल्याचे दिसून येत आहे. 

सुरुवातीला बाबासाहेब रणेर यांच्यासह गटातील शेतकऱ्यांना उत्पादन घेण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या. यावर मात करत त्यांनी सेंद्रिय शेती करण्याचा मार्ग अवलंबला यातून जमिनीचे आरोग्य सुधारले, जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढले तसेच जमिनीतील पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढली असल्याचा अनुभव यावेळी बोलताना सांगितला. त्यांच्या या कार्याची दखल घेत  महाराष्ट्र शासनाचा सेंद्रीय शेती क्षेत्रात दिला जाणारा कृषिभूषण पुरस्कार त्यांना जाहीर झाला असून याबद्दल तालुक्यातील शेतकरी , गटशेतीतील शेतकरी सदस्य व कृषी विभागातील अधिकारी तसेच प्रकल्प आत्माच्या वतीने अभिनंदन होत आहे .

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेतीparabhaniपरभणी