शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
2
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
3
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
4
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
5
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
6
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
7
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
8
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
9
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
10
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
11
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
12
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
13
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
14
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
15
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
16
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
17
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
18
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
19
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
20
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
Daily Top 2Weekly Top 5

OTP आला पण सिलिंडर मिळेना! परभणीच्या बोरीमध्ये पहाटे ५ वाजेपासून ग्राहकांच्या रांगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 16:14 IST

बोरी परिसरात गॅस सिलिंडरचा खडखडाट; १५ दिवसांपासून ग्राहक वेटिंगवर, एजन्सीसमोर गोंधळाचे वातावरण

- तुकाराम सर्जे बोरी (जि.परभणी) : एकीकडे गॅस सिलिंडरची टंचाई नसल्याचे बोलले जात आहे. तरी देखील ग्रामीण भागात सिलिंडर मिळत नसल्याने ग्राहकांच्या रांगा लागत आहेत. असेच चित्र जिंतूर तालुक्यातील बोरी येथे शुक्रवारी पहावयास मिळाले. एचपी गॅस ग्राहकांना नोंदणीचा ओटीपी येऊन पंधरा दिवस झाले. मात्र, गॅस सिलिंडर मिळत नसल्याने पहाटे पाचपासून एजन्सीसमोर गॅस धारकांनी रांगा लावल्या. अनेकांना गॅस मिळाला नसल्यामुळे रिकाम्या हाताने परतावे लागले.

मागील पंधरा दिवसांपासून बोरी परिसरात गॅस सिलिंडर मिळत नसल्यामुळे गॅस ग्राहक हैराण झाले आहेत. एजन्सी धारकांनी घरपोच गॅस पुरवठा करावा, असे बंधनकारक असताना सुद्धा गॅस घरपोच मिळत नाही. त्यामुळे ग्राहक बेहाल झाले आहेत. शुक्रवारी सकाळी पाच वाजल्यापासून एजन्सीसमोर ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या. पाचशे गॅस टाक्यांची गाव परिसरात आवश्यकता असताना त्या ठिकाणी फक्त २५० टाक्या उपलब्ध होत्या. त्यामुळे काही ग्राहकांना रिकाम्या हाताने परतावे लागले. पंधरा दिवसापासून गॅस संपल्यामुळे ग्राहकांची गैरसोय होत आहे. 

प्रशासनाने हस्तक्षेप करावाडिझेल टंचाई, गॅस टंचाई अशा समस्यामुळे बोरी ग्रामस्थ त्रस्त आहेत. इतर ठिकाणी गॅसचा पुरवठा सुरळीत होत असून बोरी या ठिकाणी तुटवडा जाणवत आहे. ही बाब प्रशासनाने लक्षात घेऊन येथील गॅस पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे. याबाबत संबंधित एचपी एजन्सी धारकांशी संपर्क केला असता त्यांच्या संपर्क होऊ शकला नाही. बोरी येथील एजन्सी धारकाकडे परिसरातील अनेक गावांतील ग्राहक मोठ्या प्रमाणावर आहेत. या ठिकाणी मुबलक गॅसचा पुरवठा करावा, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : OTP Arrived, but No Gas! Long Queues in Bori, Parbhani.

Web Summary : Despite assurances, Bori faces gas cylinder shortages. Residents queue from 5 AM, even with OTPs, yet many return empty-handed. The area needs 500 cylinders but receives only 250, causing hardship. Locals urge authorities to ensure a consistent gas supply.
टॅग्स :LPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाईparabhaniपरभणी