शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
हरभजन सिंगविरोधात समर्थकांचा रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
4
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
7
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
8
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
9
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
10
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
11
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
12
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
13
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
14
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
15
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
16
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
17
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
18
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
19
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
20
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
Daily Top 2Weekly Top 5

आता पात्र नागरिकांना निश्चित घरकुल मिळणार; 'प्रधानमंत्री आवास'साठी नव्याने सर्वेक्षणाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 11:47 IST

पात्र लाभार्थीनां मोठा दिलासा; पूर्वीच्या यादीत सुटलेल्यांना मिळणार आता संधी

- विठ्ठल भिसे पाथरी : प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये केंद्र शासनाने मोठ्या प्रमाणावर घरकुलास  मान्यता दिली आहे. २०१८ मध्ये 'आवास प्लस' ऑनलाइन सर्वेक्षण मधील तयार करण्यात आलेल्या प्रतीक्षा यादीमध्ये समावेश नसलेल्या आणि यंत्रणेद्वारे अपात्र ठरलेल्या आणि सद्यस्थितीत पात्र असलेले कुटुंबाचे   प्रधानमंत्री आवास योजना टप्पा क्रमांक दोन अंतर्गत सुधारीत सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यासाठी शासनाने ७ मार्च रोजी आदेश निर्गमित केला  आहे.

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेसाठी शासनाने २०१२ मध्ये गाव निहाय 'आवास प्लस' हे ऑनलाइन सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणाच्या आधारे शासनाने २०१८ मध्ये घरकुलासाठी गावनिहाय लाभार्थ्यांची प्रतिक्षा यादी तयार करण्यात आली होती. या प्रतीक्षा यादीतून लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून घरकुलाचा लाभ टप्प्याटप्प्याने देण्यात येत होता. पहिला टप्प्यामध्ये प्रतिक्षा यादीतील लाभार्थी मार्च २०२५ पर्यंत उद्दिष्ट पूर्ण केले जाणार आहे.  त्याप्रमाणे लाभार्थ्यांचे रजिस्ट्रेशन करण्यात येऊन पंधरा हजार रुपये पहिला हप्ता खात्यामध्ये वर्ग करण्यात आला आहे. २०१८ मध्ये झालेल्या आवास प्लस सर्वेक्षणच्या प्रतिक्षा यादीमध्ये अनेक पात्र कुटुंबाचा समावेश  नसल्याने या कुटुंबांना घरकुलाचा लाभ द्यावा अशी मागणी मागील काही वर्षापासून लाभार्थी कुटुंबाकडून सातत्याने केली जात होती. 

आता शासनाने प्रधानमंत्री आवास घरकुल योजना टप्पा क्रमांक दोन अंतर्गत पात्र कुटुंबाची सर्वेक्षण मोहीम हाती घेतली आहे. यासाठी सात मार्च रोजी राज्य शासनाच्या ग्राम विकास आणि पंचायत राज विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी आदेश निर्गमित केले आहेत. २०२४- २५ ते २०२८- २९ या पाच वर्षाच्या कालावधीसाठी प्रधानमंत्री आवास घरकुल योजना टप्पा दोन राबविला जाणार आहे. त्यासाठी घरकुल लाभार्थी निवडण्याकरीता सुधारित सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यामुळे प्रतीक्षा यादी समावेश नसलेल्या आणि पात्र कुटुंबातील लाभार्थ्यांना आता घरकुलाचा लाभ मिळण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे. 

ग्राम विकास अधिकाऱ्यांवर जबाबदारीप्रधानमंत्री आवास घरकुल योजना टप्पा क्रमांक दोन अंतर्गत सुधारित सर्वेक्षण करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकाऱ्यावर सोपविण्यात आली आहे. 

काय आहे सुधारीत निकष१) तीन/चार चाकी वाहन असणारे कुटूंबे.२) तीन/चार चाकी कृषी उपकरण असणारे कुटूंबे.३) रु. ५०,००० किसान क्रेडिट कार्ड किंवा त्याहुन अधिक क्रेडिट मर्यादा असलेले कुटूंबे.४) कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी असलेले कुटूंबे.५) शासनाकडे नोंदणीकृत बिगर कृषी उद्योग असलेली कुटुंबे.६) कुटुंबातील कोणताही सदस्य दरमहा रु.१५,००० पेक्षा जास्त कमवत असलेले कुटूंबे.७) आयकर भरणारे कुटुंबे.८) व्यवसायीक कर भरणारे कुटुंबे.९) २.५ एकर किंवा त्याहून अधिक बागायती जमीन असणारे कुटूंबे.१०) ५ एकर पेक्षा जास्त परंतु जिरायती जमीन असणारे कुटूंबे.

टॅग्स :parabhaniपरभणीPradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना