महावितरणचा शॉक; मीटर रीडिंग घेण्यास दिवसाचा उशीर, हजाराचा बसतोय फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:16 AM2021-07-25T04:16:39+5:302021-07-25T04:16:39+5:30

परभणी येथील महावितरण कार्यालयाच्या वतीने २ लाख ९९ हजार ७ वीज ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. यामध्ये १ लाख ८५ ...

MSEDCL shock; Late in the day to take meter readings, thousands are sitting! | महावितरणचा शॉक; मीटर रीडिंग घेण्यास दिवसाचा उशीर, हजाराचा बसतोय फटका!

महावितरणचा शॉक; मीटर रीडिंग घेण्यास दिवसाचा उशीर, हजाराचा बसतोय फटका!

Next

परभणी येथील महावितरण कार्यालयाच्या वतीने २ लाख ९९ हजार ७ वीज ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. यामध्ये १ लाख ८५ हजार ७३९ घरगुती वीज ग्राहक असून १३ हजार १८१ व्यावसायिक, ३ हजार ६०७ औद्योगिक तर ९६ हजार ४८० कृषीपंपधारक आहेत. या वीज ग्राहकांना महावितरणच्या वतीने वीज वापरल्यापोटी बिल अदा केले जाते. त्याअगोदर नियुक्त एजन्सीकडून वीज ग्राहकांच्या मीटरची रीडिंग घेतली जाते. मात्र, मागील काही दिवसांपासून संबंधित एजन्सीकडून एक ते दोन दिवसांचा उशीर होत आहे. मात्र, याचा फटका थेट वीज ग्राहकांना बसत आहे. एजन्सीकडून एक दिवसाचा उशीर झाला तरी ग्राहकाला हजार रुपयांचा फटका बसतो. याकडे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन वेळेत वीज मीटर रीडिंग घेण्याचे आदेश संबंधित एजन्सीला द्यावेत, अशी मागणी वीज ग्राहकांमधून होत आहे

Web Title: MSEDCL shock; Late in the day to take meter readings, thousands are sitting!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.