बाजारपेठेत भाव वाढ ; ग्राहक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:17 IST2021-05-12T04:17:17+5:302021-05-12T04:17:17+5:30

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने लागू केलेल्या संचार बंदीच्या काळात किराणा मालासह अन्य गरजेच्या वस्तूंचा तुटवडा असल्याचे भासवून गंगाखेड ...

Market price rise; Customer harassment | बाजारपेठेत भाव वाढ ; ग्राहक हैराण

बाजारपेठेत भाव वाढ ; ग्राहक हैराण

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने लागू केलेल्या संचार बंदीच्या काळात किराणा मालासह अन्य गरजेच्या वस्तूंचा तुटवडा असल्याचे भासवून गंगाखेड शहरातील ठोक व किरकोळ व्यापारी चढ्या भावाने साहित्याची विक्री करत आहेत. साखरेच्या दरात प्रति किलो दहा रुपये गोड तेलाच्या दरात प्रति लिटर मागे ५० ते ६० रुपये मूग दाळ पंधरा ते पंचवीस रुपये तूर मसूर मध्ये तीस ते पस्तीस रुपये तसेच शेंगदाणा प्रति किलोच्या दरात ३० ते ४० रुपये साबुदाणा वीस ते पंचवीस रुपये रवा आठ ते दहा रुपये तांदळाच्या प्रति किलोमागे १० रुपयांपासून ते २५ रुपयांपर्यंत जादा दर आकारून या दरात साहित्यांची विक्री करत ग्राहकांची लूट केली जात आहे त्यामुळे भाववाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गलेलठ्ठ पगार घेऊन नियुक्त केलेले कर्मचारी व अधिकारी झोपेचे सोंग घेत असल्याने ग्राहकांची लूट होत असल्याच्या संतप्त प्रक्रिया तालुका भाषांमधून व्यक्त होत आहेत याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देऊन चढ्या भावाने साहित्यांची विक्री करणाऱ्या दुकानदारांवर तत्काळ कार्यवाही करावी अशी मागणी ग्राहकांमधून होत आहे

Web Title: Market price rise; Customer harassment