शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
2
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
3
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
4
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
5
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
6
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
7
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
8
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
9
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
10
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
11
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
12
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
13
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
14
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
15
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
16
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
17
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
18
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
19
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
20
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावरील मैत्रिणीने केली लाखोंची फसवणूक; नोकरीचे आमिष देऊन उकळले पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 15:33 IST

गंगाखेड शहरातील व्यंकटेश नगरात राहणाऱ्या विवेक श्रीरंग शिसोदे यांची नांदेड जिल्ह्यातील एका तरूणीसोबत सोशल मिडियाच्या माध्यमातून ओळख

ठळक मुद्दे नौकरी लावते म्हणून बारा लाख रुपये उकळले मुंबई येथील तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल

गंगाखेड ( परभणी ) : सोशल मिडियाच्या माध्यमातून ओळख झालेल्या तरूणीने मुंबई येथे नोकरी लावण्याचे आमिष देऊन तरुणाची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. विमानतळावर वरिष्ठ अभियंता म्हणून नौकरी लावण्यासाठी तरुणीने १२ लाख १६ हजार ६०० रुपये उकळून फसवणूक केली. याप्रकरणी दि. ३१ मे रोजी रात्री उशीरा गंगाखेड पोलीस ठाण्यात तरूणीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गंगाखेड शहरातील व्यंकटेश नगरात राहणाऱ्या विवेक श्रीरंग शिसोदे यांची नांदेड जिल्ह्यातील एका तरूणीसोबत सोशल मिडियाच्या माध्यमातून ओळख झाली होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिला मुंबई येथील विमानतळावर नौकरी लागल्याचे तिने विवेक शिसोदे यास सांगितले. वरीष्ठ अधिकाऱ्यांसोबत ओळख झाल्याने तुला पण विमानतळावर वरीष्ठ अभियंता म्हणून नौकरी लावते असे तरुणीने सांगितले. यानंतर नौकरीच्या कामासाठी काही पैसे लागणार असे सांगून दि. १९ जुलै २०१९ रोजी ८२,४०० रुपये आणि डिसेंबर २०२० अखेरपर्यंत वेगवेगळ्या तारखेला एकूण ९ लाख ७९ हजार २०० रुपये उकळले. मात्र, नोकरी लागलीच नसल्याने विवेक यांनी पैसे परत मागितले. यावर तरुणीने तू दिलेली रक्कम पुढे भरली होती पण तू रिजेक्ट झाला. त्यामुळे पैसे परत मिळणार नाहीत असे सांगितले. विवेक याने पुन्हा पैसे मागताच आत्महत्या करण्याची धमकी देत पैसे देण्यास टाळाटाळ केली. दरम्यान, कर्ज काढून पैसे परत करते असे सांगून पुन्हा जानेवारी २०२१ ते एप्रिल या काळात १ लाख ५५ हजार रुपये घेतले. परंतु,

नोकरी पण मिळाली नाही आणि तरुणीने पैसेही परत दिले नाही. अशा प्रकारे जुलै २०१९ ते एप्रिल २०२१ दरम्यान एकूण १२ लाख ६ हजार ६०० रुपये तरुणीने घेतले. पैसे परत मागितले तर आत्महत्या करण्याची धमकी देत टाळाटाळ करून फसवणूक केल्याची फिर्याद विवेक शिसोदे यांनी दिल्यावरून दि. ३१ मे सोमवार रोजी रात्री उशीराने निकिता रामेश्वर चंदेल हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास सपोनि बालाजी गायकवाड हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणी