कराटे स्पर्धेत जिंतूरचा संघ प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:21 AM2021-02-25T04:21:33+5:302021-02-25T04:21:33+5:30

संत शिरोमणी नरहरी सोनार यांच्या पुण्यतिथीनिमित्त या स्पर्धेचे आयोजन केले होते. प्रारंभी स्पर्धकांना कराटे ड्रेसचे वाटप करण्यात आले. या ...

Jintur team first in karate competition | कराटे स्पर्धेत जिंतूरचा संघ प्रथम

कराटे स्पर्धेत जिंतूरचा संघ प्रथम

Next

संत शिरोमणी नरहरी सोनार यांच्या पुण्यतिथीनिमित्त या स्पर्धेचे आयोजन केले होते. प्रारंभी स्पर्धकांना कराटे ड्रेसचे वाटप करण्यात आले. या स्पर्धेत जिल्हाभरातून अनेक संघांनी सहभाग नोंदविला. नुकताच स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यात जिंतूर येथील संघाने प्रथम क्रमांक तर परभणी येथील संघाने द्वितीय क्रमांक पटकाविला. सोनार समाजाचे माजी अध्यक्ष संतोष शहानेझ, सराफा असोसिएशनचे जिल्हा संघटक अमोल कुल्थे, कवडे, बाळासाहेब डहाळ, गणेश जडे, अमोल शहाणे, शिवम टाक, संजय बोकन, कैलास शहाणे, अमोल टेहरे, दत्ता डहाळे, सचिन शहाणे, हनुमान मुंडलिक आदींच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. स्पर्धा यशस्वीतेसाठी पिंच्याक सिलेट असोसिएशनचे अध्यक्ष नरवडे, विलास मस्के, गणेश जोगदंड, कैलास टेहरे आदींनी प्रयत्न केले.

Web Title: Jintur team first in karate competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.