शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
3
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
6
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
7
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
8
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
9
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
10
६ मिनिटं वाचन केल्याने ६८% नी मानसिक तणाव कमी होतो, पण वाचनाची आवड लावायची कशी?
11
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
12
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
13
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
14
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
15
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
16
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
17
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
18
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
19
कोण आहे सीताराम बाबा? ज्यांनी भाजपा आमदाराला जोरजोरात ठोसे मारले अन् ढकलून दिलं, Video व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
Daily Top 2Weekly Top 5

बालकास ताप, पुरळची लक्षणे असल्यास असू शकतो गोवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:22 IST

परभणी : जिल्ह्यात गोवर-रुबेलाचे ९५ टक्के लसीकरण पूर्ण झाले असले तरी बालकांमध्ये तापासह पुरळ येण्याचा प्रकार आढळल्यास तो गोवर ...

परभणी : जिल्ह्यात गोवर-रुबेलाचे ९५ टक्के लसीकरण पूर्ण झाले असले तरी बालकांमध्ये तापासह पुरळ येण्याचा प्रकार आढळल्यास तो गोवर असू शकतो. त्यामुळे पालकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

पाच वर्षांपर्यंतच्या बालकांमध्ये गोवरचा ताप येऊ शकतो. सध्या जिल्ह्यात तापाची साथ सुरू आहे. डेंग्यू, चिकुन गुन्या हे आजारही मोठ्या प्रमाणात फैलावले आहेत. अशावेळी बालकांना ताप आला आणि त्यातच अंगावर पुरळ दिसत असेल तर तो ताप गोवरचाही असू शकतो. जिल्ह्यात गोवरचे प्रमाण सध्या तरी नगण्य आहे. मात्र ही दोन्ही लक्षणे आढळत असतील तर बालकांवर वेळीच उपचार करून घ्यावा.

..असे केले जाते निदान

शक्यतो लहान मुलांमध्ये ताप येणे आणि अंगावर पुरळ येणे ही गोवरची लक्षणे आहेत.

त्यातच अनेक बालकांना सर्दी आणि खोकल्याचाही त्रास जाणवतो. डोळ्यांना इन्फेक्शन होऊन चिकटतात.

ही लक्षणे असल्यास तो ताप गोवरचा असू शकतो. गोवरची साथ नसली तरी काळजी घेणे गरजेचे आहे.

९५ टक्के गोवर-रुबेलाचे लसीकरण

n बालकांमध्ये गोवरची साथ उद्भवू नये यासाठी तीन वर्षांपूर्वी गोवर-रुबेला लसीकरणाची मोहीम जिल्ह्यात राबविण्यात आली.

n या मोहिमेत जिल्ह्यातील पाच वर्षांपर्यंतच्या बालकांना लसीकरण करण्यात आले आहे.

n ९५ टक्के लसीकरण जिल्ह्यात पूर्ण झाले असल्याची माहिती मिळाली.

...तर डॉक्टरांना दाखवा

n सध्या तापाची साथ सुरू आहे. त्यात डेंग्यू आणि चिकुन गुन्यासारख्या साथी आहेत. मात्र मुलांमध्ये ताप, अंगावर पुरळ येणे यांसारखी लक्षणे मुलांमध्ये आढळत असतील तर दुर्लक्ष करू नये. त्वरित डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत.

गोवरच्या रुग्णांची संख्या अत्यल्प आहे. ही साथ नाही. मुलांना ताप येणे आणि अंगावर लाल रंगाचे पुरळ या तापात येते. तसेच डोळे येणे, खोकला आणि सर्दीही गोवरच्या तापात होते. विशेष म्हणजे अंगावरील पुरळाला खाज येत नाही. ती डोक्यापासून पायापर्यंत जाते. अशा प्रकारची लक्षणे असल्यास तो ताप गोवरचा असू शकतो.

- डॉ.श्याम जेथलिया