माहेरी जाणाऱ्या पत्नीला काठीने पतीची मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:17 IST2021-05-13T04:17:20+5:302021-05-13T04:17:20+5:30

वालूर येथील इरफान जुम्मा शहा याचे त्याची पत्नी शहनाज इरफान शाह यांच्याशी जमत नसल्याने त्याची पत्नी माहेरी जिंतूर तालुक्यातील ...

Husband beats wife to death | माहेरी जाणाऱ्या पत्नीला काठीने पतीची मारहाण

माहेरी जाणाऱ्या पत्नीला काठीने पतीची मारहाण

वालूर येथील इरफान जुम्मा शहा याचे त्याची पत्नी शहनाज इरफान शाह यांच्याशी जमत नसल्याने त्याची पत्नी माहेरी जिंतूर तालुक्यातील आसेगाव येथे आईकडे ४ वर्षांपासून विभक्त राहते. इरफान शहा याने ७ मे रोजी पत्नी शहनाज शाह यांना फोन करून सणासाठी कपडे घेऊन देतो, म्हणून वालूर येथे बोलावून घेतले. त्यामुळे शहनाज शाह या मुलांसह ९ मे रोजी वालूर येथे पतीकडे आल्या. दोन दिवस राहून कपडे घेतल्यानंतर १० मे रोजी शहनाज शाह या माहेरी जात असताना पती इरफान शहा याने त्यांना जाण्यास मज्जाव केला. तसेच शिवीगाळ करून काठी व चापट बुक्क्याने मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. यावेळी शहनाज शहा यांनी आरडाओरडा केल्यानंतर इतरांनी येऊन सोडवासोडव केली. त्यानंतर सेलू पोलीस ठाणे गाठून शहनाज शहा यांनी पती इरफान शहा याच्या विरोधात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Husband beats wife to death