कारच्या धडकेत मुलीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:13 IST2021-07-09T04:13:07+5:302021-07-09T04:13:07+5:30

उजळंबा येथील शेख मोबीन शेख दवलू यांची पत्नी व आयेशा आणि अलिशा या दोन मुली सोमवारी सायंकाळी ५ च्या ...

Girl killed in car crash | कारच्या धडकेत मुलीचा मृत्यू

कारच्या धडकेत मुलीचा मृत्यू

उजळंबा येथील शेख मोबीन शेख दवलू यांची पत्नी व आयेशा आणि अलिशा या दोन मुली सोमवारी सायंकाळी ५ च्या सुमारास शेतातून काम करून घरी येत असताना उजळंबा शिवारातील खदानीजवळ आयेशा शेख या मुलीस एमएच २२ एडी ३०३३ क्रमांकाच्या कारचालकाने भरघाव वेगाने वाहन चालवून पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात आयेशा शेख गंभीर जखमी झाली. जखमी आयेशाला उपचारासाठी परभणी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी तपासणी करून आयेशाचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. मृत आयेशावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत शेख मोबीन शेख दवलू यांनी दैठणा पोलीस ठाण्यात बुधवारी फिर्याद दिली. त्यावरून एमएच २२ एडी ३०३३ क्रमांकाच्या कार चालकाविरोधात भरघाव वेगाने वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Girl killed in car crash