मारहाणीच्या निषेधार्त व्यापारी महासंघाचा मानवतमध्ये मोर्चा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 02:07 PM2018-04-27T14:07:01+5:302018-04-27T14:07:01+5:30

जिनिंगच्या व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज सकाळी व्यापारी महासंघाच्या वतीने पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. 

Front of Manashakti in Manavangha's Federation protesting against marriages | मारहाणीच्या निषेधार्त व्यापारी महासंघाचा मानवतमध्ये मोर्चा 

मारहाणीच्या निषेधार्त व्यापारी महासंघाचा मानवतमध्ये मोर्चा 

Next

मानवत (परभणी ) : जिनिंगच्या व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज सकाळी व्यापारी महासंघाच्या वतीने पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. 

शहरातील रुढी शिवारात असलेल्या एका जिनिंगमध्ये सोमवारी (दि.२३ ) गावातील पाच ते सहाजणांनी कापसाला भाव वाढवून देण्याची मागणी करत जिनींग व्यवस्थापक गोपाल तोष्णीवाल यांना मारहाण केली. यासोबतच तेथील कर्मचारी गौरव लड्डा, रामा वैद्य, रामनिवास सारडा यांनासुद्धा  लाथाबुक्क्यानी मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली. यानंतर या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला. याप्रकारामुळे व्यापाऱ्यामध्ये दहशत निर्माण झाली. याचा निषेध करण्यासाठी आज सकाळी व्यापारी महासंघाच्या वतीने पोलीस स्थानकावर निषेध मोर्चा काढण्यात आला. 

काळ्या फिती लावलेल्या व्यापाऱ्यांचा मोर्चा संत सावतामाळी चौकातुन मुख्यरस्त्याने पोलीस ठाण्यावर धडकला. अशा घटना पुढे घडू नयेत यासाठी पोलीस प्रशासनाने यात लक्ष घालण्याचे निवेदन पोलीस निरीक्षक प्रदिप पालिवाल यांना देण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक पालिवाल यांनी अशा घटनानंतर होणार नाहीत याबाबत खबरदारी घेण्यात येईल असे आश्वासन दिले. 

मोर्च्यात व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय लड्डा, उपाध्यक्ष जयप्रकाश पोरवाल, सचिव कृष्णा बाकळे, बाजार समितीचे संचालक ज्ञानेश्वर मोरे, जिनिंग संघटनेचे अध्यक्ष गिरीश कत्रूवार, माजी नगरसेवक सुरेश काबरा, श्रीकिशन सारडा, शैलेश काबरा, दत्तप्रसाद बांगड, डॉ राजकुमार लड्डा, आडत संघटनेचे अध्यक्ष आश्रोबा कुऱ्हाडे, रामनारायण काबरा, किराणा संघटनेचे अध्यक्ष सचिन कोक्कर, गोविंद राठी, विजय बांगड, प्रकाश पोरवाल.  यांच्यासह किराणा संघटना, आडत संघटना, कापड संघटना अशा विविध संघटनांची पदाधिकारी व्यापारी मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते. 

Web Title: Front of Manashakti in Manavangha's Federation protesting against marriages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.