मानवत येथे गॅस सिलेंडरच्या स्फोटात चार दुकाने भस्मसात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 14:05 IST2019-01-28T14:04:26+5:302019-01-28T14:05:08+5:30
आज सकाळी ९ वाजता ही घटना घडली असून यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.

मानवत येथे गॅस सिलेंडरच्या स्फोटात चार दुकाने भस्मसात
मानवत : शहरातील आठवडे बाजार परिसरात गॅस सिलेंडरच्या स्फोटात एका हॉटेललसह अन्य तीन दुकान जळुन खाक झाली. आज सकाळी ९ वाजता ही घटना घडली असून यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, आठवडे बाजार परिसरात कॅनरा बॅंके समोर असलेल्या एका हॉटेल मधील गॅस सिलेंडरने पेट घेतल्याने स्फोट झाला. यानंतर आगीने बाजूच्या तीन दुकानांना कवेत घेतले.दरम्यान, पाथरी येथून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. सकाळी दहा वाजता आगीवर नियंत्रण मिळवित आग विझवण्यात आले. मात्र यात चारही दुकान जळून खाक झाली आहेत. तसेच आज येथील आठवडी बाजाराचा दिवस असतो, मात्र आग सकाळी लागल्याने पुढील अनर्थ टळला.
घटनेची माहिती मिळताच पालिकेचे मुख्याधिकारी उमश ढाकणे, डॉ अंकुश लाड, अनंत भदर्गे, अनंत गोलाईत, स पो नि प्रविण दिनकर यांनी घटनास्थळी भेट दिली.
पहा व्हिडिओ :