आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:12 IST2021-06-30T04:12:19+5:302021-06-30T04:12:19+5:30

मंठा तालुक्यातील ईडोळी खुर्द येथील त्रिवेणी गणपत कदम यांनी कोतवाली पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. त्यानुसार त्यांची मुलगी सिद्धी हिला ...

Four charged with inciting suicide | आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा

मंठा तालुक्यातील ईडोळी खुर्द येथील त्रिवेणी गणपत कदम यांनी कोतवाली पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. त्यानुसार त्यांची मुलगी सिद्धी हिला तिच्या सासरी त्रास दिला जात होता. शहरातील शांतीनिकेतन कॉलनीतील रहिवासी विजय घाडगे, रेखा विष्णुदास घाडगे, विष्णुदास घाडगे, राजेश घाडगे यांनी सिद्धी विजय घाडगे हिला वारंवार मानसिक त्रास दिला. हुंड्यातील उरलेले दीड लाख रुपये का देत नाहीस, या कारणावरून शिवीगाळ केली. तसेच वेळोवेळी मारहाण केली. सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून सिद्धी हिने २३ जून रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास विष प्राशन करून आत्महत्या केली. तिच्या मृत्यूस सासरची मंडळी जबाबदार असल्याची तक्रार त्रिवेणी कदम यांनी २६ जून रोजी दिली. त्यावरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गुलाब बाचेवड यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक केंद्रे या करीत आहेत.

Web Title: Four charged with inciting suicide