आधार कार्ड अपडेटसाठी पाच तास रांगेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:19 IST2021-02-24T04:19:15+5:302021-02-24T04:19:15+5:30

मुख्यमंत्री रोजगार योजनेला बॅंकांकडून खो परभणी : राज्य सरकारच्या मुख्यमंत्री रोजगार योजनेला बॅंकांकडून प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे लाभार्थी आर्थिक ...

Five hours queue for Aadhar card update | आधार कार्ड अपडेटसाठी पाच तास रांगेत

आधार कार्ड अपडेटसाठी पाच तास रांगेत

मुख्यमंत्री रोजगार योजनेला बॅंकांकडून खो

परभणी : राज्य सरकारच्या मुख्यमंत्री रोजगार योजनेला बॅंकांकडून प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे लाभार्थी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

दुधना नदीपात्रातून अवैध वाळू उपसा

सेलू : तालुक्यात वाळूमाफिया पुन्हा सक्रिय झाले असून, दुधना नदी पात्रातून दिवस-रात्र अवैध वाळूचा उपसा केला जात आहे. ट्रॅक्टरमधून सर्रास या वाळूची वाहतूक केली जात असून, यातून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. वाळूला सोन्याचे भाव आल्याने वाळूमाफिया मालामाल होत आहेत.

मुख्य रस्त्यांच्या पूर्णत्वाचे आशा

परभणी : गेल्या अनेक वर्षांपासून चांगल्या रस्त्याकडे डोळे लावून बसलेल्या परभणीकरांना या वर्षात तरी जिंतूर, गंगाखेड, मानवत रोड ते झिरो फाटा या प्रमुख तीन रस्त्यांच्या पूर्णत्वाची आशा लागली आहे.

बेकायदेशीर मुरूम उपसाकडे दुर्लक्ष

बोरी: जिंतूर तालुक्यातील कोकपासून जवळच असलेल्या रोहिला पिंपरी रस्त्यावरील गायरान जमिनीतून मागील पंधरा दिवसापांसून मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या मुरमाचा उपसा केला जात आहे. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी या याकडे लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

४३ गावातील ग्रामस्थांचा सिंचनाचा प्रश्न सुटेना

परभणी : परभणी व मानवत तालुक्यातील माथ्यावर असलेल्या ४३ गावांमधील शेतकऱ्यांनी सिंचनाच्या प्रश्नावर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना साकडे घातले होते. मात्र अद्यापही या ४३ गावांतील ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्‍न सुटलेला नाही. त्यामुळे या गावातील ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Web Title: Five hours queue for Aadhar card update