कर न भरल्यास होणार जप्तीची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:21 IST2021-08-23T04:21:14+5:302021-08-23T04:21:14+5:30

महापालिकेच्या वतीने ५० हजारांपेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्या मालमत्ताधारकांकडून वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे़. तसेच नागरिकांसाठी विलंब शास्ती १०० ...

Failure to pay tax will result in confiscation | कर न भरल्यास होणार जप्तीची कारवाई

कर न भरल्यास होणार जप्तीची कारवाई

महापालिकेच्या वतीने ५० हजारांपेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्या मालमत्ताधारकांकडून वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे़. तसेच नागरिकांसाठी विलंब शास्ती १०० टक्के सूट अभय योजना लागू केली आहे. मालमत्ता कर व पाणीपट्टी कर विलंब शास्तीत ३१ ऑगस्टपर्यंत थकीत व चालू कर एकरकमी भरल्यास मागणी बिलातून विलंब शास्तीत १०० टक्के सूट देण्यात येत आहे़ १ सप्टेंबरनंतर हा लाभ दिला जाणार नाही़ नागरिकांनी थकीत व चालू वर्षातील कर वसुली लिपिक यांच्याकडे तसेच प्रभाग समिती अ, ब, क कार्यालयात करावा. याशिवाय महापालिकेच्या मागणी बिलावरील क्यूआर कोड या लिंकवर ऑनलाइन नेट बँकिंगद्वारे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय आणि क्यूआर कोडद्वारे मालमत्ता करात भरणा करावा़ कर भरणा न केल्यास महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील अनुसूची ड चे प्रकरण ८ कराधान नियम क्रमांक ४२ अन्वये जप्तीची कारवाई केली जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, उपायुक्त प्रदीप जगताप यांनी कळविले आहे.

Web Title: Failure to pay tax will result in confiscation