शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

निम्न दुधना प्रकल्पातून नदीपाञात पाणी सोडले; तीन तालुक्यातील ५० गावांना दिलासा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 14:21 IST

नदीकाठावरील अनेक गावात पाणी टंचाई निर्माण झाल्याने शुक्रवारी दुधना प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडून नदीपाञात पाणी सोडले आहे.

ठळक मुद्देटेल पर्यंत पाणी जाण्यासाठी १२. ७७ दलघमी एवढे पाणी लागणार दुधना प्रकल्पात सद्यस्थितीत ६९ टक्के जिवंत जलसाठा आहे. 

सेलू ( परभणी ) : दुधना नदीकाठावरील गावात पाणीटंचाई निर्माण झाल्याने निम्न दुधना प्रकल्पातून शुक्रवारी सकाळी ९. ३० वाजता ६ दरवाजे उघडून नदीपाञात पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे नदीकाठावरील परभणी, मानवत आणि सेलू या तीन तालुक्यातील ५० गावांना पाणीटंचाईपासून दिलासा मिळणार आहे.

मे महिन्यात दुधना नदी काठावरील अनेक गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. नदीकाठावरील गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी दुधना नदीपाञात आहेत. पंरतु, पाणी पातळीत घट झाल्याने नदीकाठावरील गावांना पाणी पुरवठा करतांना ग्रामपंचायतींना कसरत करावी लागत आहे. तसेच ग्रामस्थांना पाण्यासाठी भंटकती करण्याची वेळ आली होती. पाणी टंचाई लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने पाटबंधारे विभागाला १९ मे रोजी पञ देऊन नदीपाञात पाणी सोडण्याची सुचना केली होती. त्यानंतर जिपचे अग्रीम पाणीपट्टी पञाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारी प्रकल्पाचे १, २०,२, १९ हे चार दरवाजे २० सेंमी ने तर १८ व ३ क्रमांकाचे १० सेंमी दरवाजे उचलून ३०५६ क्युसेस विसर्ग नदीपाञात सोडण्यात आला आहे. दुधना प्रकल्प ते पूर्णा संगमापर्यंतचे ६८ किमी अंतर आहे. संगमापर्यंत पाणी पोहचण्यासाठी ४१ तासांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.नदीपाञात पाणी सोडल्याने सेलू तालुक्यातील १७ परभणी तालुक्यातील २५ तर मानवत तालुक्यातील ८ अशा एकूण ५० गावांची तहान भागणार आहे. दरम्यान,  परभणीचे आ.डाॅ राहूल पाटील यांनी पाणी सोडण्याची मागणी केली होती. 

१२.७७ दलघमी पाणी लागणार नदीकाठावरील अनेक गावात पाणी टंचाई निर्माण झाल्याने शुक्रवारी दुधना प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडून नदीपाञात पाणी सोडले आहे. टेल पर्यंत पाणी जाण्यासाठी १२. ७७ दलघमी एवढे पाणी लागणार असल्याचे प्रकल्पाच्या सुञांनी सांगितले. दुधना प्रकल्पात सद्यस्थितीत ६९ टक्के जिवंत जलसाठा आहे. 

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणी