वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन विवाहितांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:14 IST2020-12-25T04:14:35+5:302020-12-25T04:14:35+5:30

पूर्णा शहरातील अजीज नगर भागातील रहिवासी असिफा बेगम (२४) यांनी १४ डिसेंबर रोजी दुपारी त्यांच्या घरात चहा करण्यासाठी गॅस ...

Death of two married people in different incidents | वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन विवाहितांचा मृत्यू

वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन विवाहितांचा मृत्यू

पूर्णा शहरातील अजीज नगर भागातील रहिवासी असिफा बेगम (२४) यांनी १४ डिसेंबर रोजी दुपारी त्यांच्या घरात चहा करण्यासाठी गॅस चालू केला. यावेळी जोराचा भडका उडाल्याने त्या गंभीर भाजल्या.उपचारासाठी त्यांना तातडीने नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे उपचार सुरू असताना २० डिसेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी शेख अय्युब यांच्या फिर्यादीवरून पूर्णा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.दुसरी घटना सुहागन येथे घडली. येथील रहिवासी विवाहिता विमल संतोष वाघमारे यांना पोटात दुखत असल्याने उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्यांचा नांदेड येथील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणी त्यांचे पती संतोष वाघमारे यांनी पूर्णा पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या दोन्ही घटनांचा तपास पूर्णा पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे.

Web Title: Death of two married people in different incidents