मृत्यूप्रकरणी दुचाकी चालकाविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:24 IST2021-06-16T04:24:26+5:302021-06-16T04:24:26+5:30

उमरीकडून परभणीकडे ५ जून रोजी रात्री ११ च्या सुमारास एमएच २२ एएल ७१७३ क्रमांकाच्या दुचाकीवरून येत असताना वाहनचालकाने भरघाव ...

Crime against a two-wheeler in a death case | मृत्यूप्रकरणी दुचाकी चालकाविरोधात गुन्हा

मृत्यूप्रकरणी दुचाकी चालकाविरोधात गुन्हा

उमरीकडून परभणीकडे ५ जून रोजी रात्री ११ च्या सुमारास एमएच २२ एएल ७१७३ क्रमांकाच्या दुचाकीवरून येत असताना वाहनचालकाने भरघाव वेगाने वाहन चालवून दैठणा ठाण्याच्या हद्दीत रस्त्याच्या बाजूला असलेल्या वस्तूला धडक दिली. या अपघातात पाठीमागे बसलेले शिवराम साहेबराव शिंदे (रा. लोणार ता. लोणार, जि. बुलडाणा) हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी परभणी येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना शिवराम शिंदे यांचा ६ जून रोजी मृत्यू झाला. याबाबत दैठणा पोलिसांनी वारंवार संपर्क साधूनही दुचाकी चालक पोलीस ठाण्यात हजर झाला नाही. याबाबत पोलीस कर्मचारी काशीनाथ रोहिदास मुलगीर यांनी १४ जून रोजी फिर्याद दिली. त्यावरून एमएच २२ एएल ७१७३ क्रमांकाच्या दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Crime against a two-wheeler in a death case