पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:13 IST2021-07-08T04:13:26+5:302021-07-08T04:13:26+5:30

गंगाखेड तालुक्यातील महातपुरी शिवारात ६ जुलै रोजी रात्री दहाच्या सुमारास वाळूची चोरटी विक्री होत असल्याची बाब पोलिसांच्या निदर्शनास आली. ...

Crime against five persons for arguing with the police | पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हा

पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हा

गंगाखेड तालुक्यातील महातपुरी शिवारात ६ जुलै रोजी रात्री दहाच्या सुमारास वाळूची चोरटी विक्री होत असल्याची बाब पोलिसांच्या निदर्शनास आली. यावेळी पोलिसांनी हात दाखवून आरोपींना थांबविले. तपासणी करून वाळूचा ट्रॅक्टर पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना आरोपींनी पोलिसांसोबत हुज्जत घातली. ‘तुम्ही कोण आहात आणि ट्रॅक्टर कोठे घेऊन जातात,’ अशी विचारणा आरोपींनी केली. ट्रॅक्टर पोलीस ठाण्यात नेला जात असल्याचे आरोपींना सांगितल्यानंतर आरोपींनी आम्ही पोलीस काय असतात, मानत नाही, असे म्हणून शासकीय कामात अडथळा निर्माण करीत पोलिसांनाच धक्काबुक्की केली. या प्रकरणी पोलीस कर्मचारी अनिल इंगळे यांच्या फिर्यादीवरून शेख गुलाब शेख इस्माईल, उमेश कचरे, सुनील कचरे, गंगाधर कचरे, कैलास वाघमोडे (सर्व रा. महातपुरी ता. गंगाखेड) यांच्याविरुद्ध सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक गिरी तपास करीत आहेत.

Web Title: Crime against five persons for arguing with the police