मनपाची पथके शहरातून गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:16 IST2021-04-16T04:16:39+5:302021-04-16T04:16:39+5:30

स्टेडियम परिसरातील ढापा गायब परभणी : येथील जिल्हा स्टेडियम परिसरातील मुख्य प्रवेशद्वारासमोर नालीवरील ढापा गायब झाल्याने वाहनधारकांसाठी धोका निर्माण ...

Corporation squads disappear from the city | मनपाची पथके शहरातून गायब

मनपाची पथके शहरातून गायब

स्टेडियम परिसरातील ढापा गायब

परभणी : येथील जिल्हा स्टेडियम परिसरातील मुख्य प्रवेशद्वारासमोर नालीवरील ढापा गायब झाल्याने वाहनधारकांसाठी धोका निर्माण झाला आहे. मागील एक महिन्यापासून नालीवर ढापा नसल्याने अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. महापालिका प्रशासनाने या ठिकाणी नवीन ढापा टाकावा, अशी नागरिकांची मागणी आहे.

देशमुख हॉटेल भागात रस्त्यावर पाणी

परभणी : येथील देशमुख हॉटेल परिसरात गुरुवारी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. या भागातील जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती आहे. नळाला पाणी आल्यानंतर ते रस्त्यावर येत आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे. शिवाय वाहनधारकांनाही अडथळा निर्माण होत आहे. मनपाने येथील समस्या सोडवावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

दुभाजकांवरील झाडांना दिले पाणी

परभणी : येथील वसमत रस्त्यावरील दुभाजकांवर लावलेल्या झाडांसाठी मनपाने पाण्याची सुविधा केली आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने ही झाडे वाळत आहेत. ही बाब लक्षात घेऊन मनपाने टँकरच्या साह्याने झाडांना पाणी देण्याचे नियोजन केले आहे. गुरुवारी या झाडांना पाणी देण्यात आले.

राष्ट्रीय महामार्गावर वाढले खड्डे

परभणी : कल्याण- निर्मल या राष्ट्रीय महामार्गावर मोठे खड्डे झाले आहेत. मानवत तालुक्यातील कोल्हा पाटी ते परभणी शहरापर्यंत हा रस्ता खराब झाला आहे. मध्यंतरी रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू केले होते; मात्र आता हे काम ठप्प आहे. त्यामुळे अर्धवट अवस्थेत सोडलेल्या कामामुळे वाहनधारकांची मात्र त्रेधातिरीपिट होत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे, अशी वाहनधारकांची मागणी आहे.

राहाटी बंधाऱ्यावर पूल उभारणीस गती

परभणी : वसमत रस्त्यावरी राहाटी येथील बंधाऱ्यावर नव्याने पूल उभारणीस गती आहे. या मार्गावरील जुना पूल धोकादायक झाला आहे. पुलावरील रस्त्याला जागोजागी खड्डे पडले असून, वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे. शिवाय पुलाचे कठडेही गायब झाले होते. आता नवीन पुलाचे काम सुरू झाल्याने नागरिकांच्या आशा वाढल्या आहेत.

Web Title: Corporation squads disappear from the city