coronavirus : परभणीत आणखी एकजण कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 08:39 IST2020-05-19T08:39:11+5:302020-05-19T08:39:45+5:30

परभणीत आत्तापर्यंत 7 जण कोरोना पॉझिटिव्ह

coronavirus: Another corona positive in Parbhani | coronavirus : परभणीत आणखी एकजण कोरोना पॉझिटिव्ह

coronavirus : परभणीत आणखी एकजण कोरोना पॉझिटिव्ह

परभणी : शहरात पुण्याहून आलेला एक 20 वर्षीय युवक कोरोना पॉझिटिव्ह आढळला असून प्रशासनाने सदरील युवक राहत असलेला साखला प्लॉट परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे.                 

पुणे येथील हडपसर भागातील फातेमा नगर भागातील 20 वर्षीय युवक 17 एप्रिल रोजी कारने परभणीत आला. त्यानंतर त्याची जिल्हा रुग्णालयात तपासणी करून स्वॅब घेऊन ते नांदेड येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. याबाबतचा अहवाल मंगळवारी सकाळी प्रशासनास प्राप्त झाला. त्यात या युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी साखला प्लॉट परिसर तातडीने सील करण्याचे आदेश दिले व हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे.

दरम्यान, परभणीत आत्तापर्यंत 7 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यातील एक जण कोरोनामुक्त झाला आहे. तर 6 जणांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: coronavirus: Another corona positive in Parbhani