शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
5
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
6
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
7
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
8
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
9
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
10
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
11
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
12
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
13
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
14
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
15
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
16
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
17
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
18
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
19
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
20
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू

गोदापात्रातील पोलीस कारवाईत १५ वाळूमाफियांवर गुन्हा दाखल; १ कोटी ५६ लाख रुपयांचे साहित्य जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 16:33 IST

गंगाखेड तालुक्यातून वाहत असलेल्या गोदावरी नदी पात्रातील चार वाळू धक्के वगळता अन्य वाळू धक्क्यांचे लिलाव झालेले नसतांना ही बहुतांश धक्क्यांवरून वाळूचे विनापरवाना अवैधरित्या उत्खनन करून वाहतुक केल्या जात असल्याने शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे.

गंगाखेड: तालुक्यातील दुस्सलगाव व मुळी शिवारात गोदावरी नदी पात्रातून होत असलेल्या अवैध वाळूउपस्या प्रकरणी दि. ६ एप्रिल रोजी रात्री अकरा वाजता गंगाखेड पोलीसांनी कारवाई केली. या प्रकरणी दि. ९ एप्रिल रोजी सकाळी पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाई वेळी पोलिसांनी तीन जेसीबी मशीनसह दोनशे ब्रास वाळू साठा असे एकूण एक कोटी ५६ लाख रुपये किंमतीचे साहित्य जप्त केले. 

गंगाखेड तालुक्यातून वाहत असलेल्या गोदावरी नदी पात्रातील चार वाळू धक्के वगळता अन्य वाळू धक्क्यांचे लिलाव झालेले नसतांना ही बहुतांश धक्क्यांवरून वाळूचे विनापरवाना अवैधरित्या उत्खनन करून वाहतुक केल्या जात असल्याने शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. तालुक्यातील महातपुरी, आनंदवाडी, भांबरवाडी व पिंप्री या चार धक्क्यांचा लिलाव झालेला असतांना लिलावन झालेल्या खडका धरणाखालील धारासुर शिवारातील गोदावरी नदी पात्रापासून ते मसला दरम्यान तालुक्याच्या अंतिम टोकापर्यंत धारासुर, मैराळसावंगी, गौंडगाव, चिंचटाकळी, खळी, दुस्सलगाव, मुळी, धारखेड, गंगाखेड शहर, रेल्वे पूल परिसर, पिंप्री, नागठाणा व मसला आदी गावालगतच्या पात्रातून राजरोसपणे अवैधरित्या वाळू उपसा केल्या जात आहे. महसूल प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने वाळू माफियांचे चांगलेच फावत आहे. 

दि. ६ एप्रिल रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास रात्र गस्तीवर असलेल्या पोलिसांना तालुक्यातील दुस्सलगाव ते मुळी दरम्यान गोदावरी नदी पात्रातून मशीनद्वारे अवैधरित्या वाळु उपसा केल्या जात असल्याची गोपनिय माहिती मिळाली. यानंतर गंगाखेड पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर, जमादार रतन सावंत, पो. ना. दत्तराव पडोळे आदींनी मुळी शिवारातील नदी पात्रात छापा मारला. यावेळी चार ते पाच हायवा दुस्सलगाव शिवारातील नदी काठावरून पळून गेल्या. तर मुळी शिवारातील गोदावरी नदी पात्राजवळ एक मशीन उभ्या स्थितीत मिळून आले. तर नदी पात्रातून वाळु उपसा करणारे दुसरे मशीन चालकाने तात्काळ आणून या मशीनच्या बाजूला लावून पळ काढला. येथे केलेल्या पाहणीत मिळून आलेल्या अंदाजे दोनशे ब्रास वाळूचा ढिगारा व दोन पोकलेन मशीन आढळून आले. 

यानंतर सहायक पोलीस उपनिरीक्षक बाबुराव घरजाळे, पोलीस शिपाई प्रल्हाद वाघ यांना मुळी शिवारात थांबवून पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांचे पथक मुळी ते दुस्सलगाव दरम्यान गोदावरी नदी पात्रात बनविलेल्या मातीच्या कृत्रिम बांधावरून दुस्सलगाव शिवारातील नदी काठावर आले. येथे मातीच्या ढिगाऱ्याच्या आडोशाला उभे असलेले जेसीबी मशीन मिळून आले व नदी काठावरील टेकड्यावरील शेतात ही वाळूचे ढीग सापडले. तीन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत ६ लाख रुपये किंमतीचा अंदाजे २०० ब्रास वाळूचा साठा, ८० लाख रुपये किंमतीची टू टेन जेसीबी मशीन, ६० लाख रुपये किंमतीची जेसीबी कंपनीची एल आर मशीन व १० लाख रुपये किंमतीची जेसीबी मशीन असा एकूण १ कोटी ५६ लाख रुपये किंमतीचे साहित्य  पोलिसांनी जप्त केले. याप्रकरणी तीन मशीनचे चालकमालक संदीप वाळके, कालू भाई, अळनुरे वकील, राजू खान मोहम्मद खान, ओमकार शहाणे, मंजूर इलाही उर्फ राजू यांच्यासह पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि बालाजी गायकवाड करीत आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारीsandवाळू