स्वतःपुरता प्रचार केल्यास थेट पॅनलमधून बाहेर काढणार; चंद्रशेखर बानकुळेंच्या स्पष्ट सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 09:18 IST2026-01-05T09:18:38+5:302026-01-05T09:18:38+5:30
या बैठकीत त्यांनी निवडणूक प्रचाराबाबत स्पष्ट आणि कडक सूचना दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

स्वतःपुरता प्रचार केल्यास थेट पॅनलमधून बाहेर काढणार; चंद्रशेखर बानकुळेंच्या स्पष्ट सूचना
परभणी : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी परभणी येथे पक्षाच्या उमेदवारांची व पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी निवडणूक प्रचाराबाबत स्पष्ट आणि कडक सूचना दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
बावनकुळे यांनी सांगितले की, निवडणूक पॅनल पद्धतीने लढविली जात असताना कोणत्याही उमेदवाराने केवळ स्वतःपुरताच प्रचार करणे पक्षशिस्तीला धरून नाही. प्रभागातील चारही उमेदवारांनी एकत्रितपणे प्रचार करणे आवश्यक असून, मतदारांकडे जाताना संपूर्ण पॅनलसाठीच मतदान मागावे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
कोणीही उमेदवार वैयक्तिक मतांसाठी स्वतंत्र प्रचार करीत असल्याचे आढळल्यास संबंधित उमेदवाराला कोणतीही तडजोड न करता थेट पॅनलमधून बाहेर काढण्यात येईल, असा कडक इशाराही त्यांनी दिला.