शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

भिज पावसाने सुखावला बळीराजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:13 IST

परभणी : जिल्ह्यात यावर्षी चांगला पाऊस होत असून, गुरुवारी भिज पावसाने हजेरी लावली. दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी झाल्याने शेतकरी ...

परभणी : जिल्ह्यात यावर्षी चांगला पाऊस होत असून, गुरुवारी भिज पावसाने हजेरी लावली. दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी झाल्याने शेतकरी सुखावला आहे.

यावर्षी जिल्ह्यात शेतीपूरक पाऊस होत आहे. मान्सूनपूर्व पावसाने धडाक्‍यात हजेरी लावली. त्यानंतर मान्सूनचा पाऊसही होत आहे. आतापर्यंत अनेक भागांमध्ये पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकरी पेरणीच्या कामांमध्ये गुंतले आहेत.

गुरुवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. अधूनमधून मध्यम स्वरूपाचा पाऊस होत असल्याने नागरिकांची मात्र तारांबळ उडाली. जिल्ह्यात सर्वदूर या पावसाने हजेरी लावली आहे.

आतापर्यंत सर्वच भागात पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकरी आता पेरणीच्या तयारीला लागले आहेत. काही भागात यापूर्वीच कापसाची लागवड झाली होती. आता सोयाबीन पेरणी केली जात आहे. गुरुवारी झालेला पाऊस शेतीसाठी पूरक ठरला आहे. या पावसाने जमिनीत खोलवर पाणी मुरण्यास मदत होणार असल्याने शेतकरी सुखावले आहेत. दरम्यान, यावर्षी जून महिन्यातच पेरण्यांना प्रारंभ झाला. शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीन या दोन प्रमुख पिकांच्या पेरणीवर भर दिला आहे.

जिल्ह्यात बुधवारी रात्रीदेखील जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. पूर्णा, परभणी आणि सोनपेठ या तालुक्यांमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. गुरुवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी १३.१ मिमी पाऊस झाला आहे. परभणी तालुक्यात २४.२, गंगाखेड १७.२, पाथरी ११, पूर्णा १७.९, पालम ११.७ आणि सोनपेठ तालुक्यात १८.८ मिमी पाऊस झाला आहे. दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे.

चुकीच्या नोंदीमुळे संताप

बुधवारी रात्री जिल्हाभरात पावसाने हजेरी लावली. या पावसाची नोंद प्रशासनाने घेतली आहे; परंतु ही नोंद घेताना परभणी तालुक्यातील सिंगणापूर मंडळात चुकीच्या पद्धतीने नोंद घेण्यात आली. या मंडळांमध्ये पावसाचे प्रमाण अत्यल्प असताना प्रशासनाने मात्र सिंगणापूर मंडळात १२८.३ मिमी पावसाची नोंद घेतली आहे. सिंगणापूर मंडळांमध्ये बुधवारी रात्री पावसाने हजेरी लावली; परंतु हा पाऊस अत्यल्प स्वरूपाचा होता. प्रशासनाने घेतलेल्या नोंदीनुसार सिंगणापूर मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे; परंतु या मंडळात अतिवृष्टीसारखा पाऊस झाला नाही. या गोंधळामुळे शेतकऱ्यांमध्ये मात्र तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

सोनपेठ तालुक्यातील ७ गावांचा संपर्क तुटला

सोनपेठ तालुक्यात बुधवारी रात्री झालेल्या पावसामुळे शेळगाव ते उक्कडगाव या रस्त्यावरील नाल्यावर पाणी आल्याने गोदावरी नदी काठावरील सात गावांचा संपर्क गुरुवारी सकाळी काही वेळासाठी तुटला होता. बुधवारच्या पावसामुळे शेळगाव ते उक्कडगाव रस्त्यावरील नाल्याला पाणी आले. त्यामुळे या रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत होते. परिणामी काही काळासाठी हा मार्ग बंद राहिला. त्यामुळे उक्कडगाव, गंगापिंपरी, गोळेगाव, पिंपळगाव आदी ७ गावांचा संपर्क तुटला होता. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पाणी ओसरल्यानंतर या मार्गावरून वाहतूक पूर्ववत झाली. विशेष म्हणजे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत या सातही गावांनी रस्त्याच्या प्रश्नासाठी मतदानावर बहिष्कार टाकला होता; परंतु अद्यापपर्यंत हा प्रश्‍न सुटलेला नाही.