शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

एका मताची ताकद! परभणीत उद्धवसेनेच्या उमेदवाराचा १ मताने थरारक विजय, भाजपला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 17:38 IST

समाज माध्यमावर एकच चर्चा ; एका मताची प्रभाग एक अ मधील लढत ठरली चुरशीची

- राजन मंगरुळकर
परभणी:
"निवडणुकीच्या दिवशी सुट्टी आहे, कशाला मतदान करायला जायचं? माझ्या एका मताने काय फरक पडणार आहे?" असा प्रश्न विचारणाऱ्या मतदारांसाठी परभणी महानगरपालिकेचा निकाल हा डोळे उघडणारा ठरला आहे. प्रभाग क्रमांक १ 'अ' मधील लढतीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार व्यंकट डहाळे यांनी भाजपच्या प्रसाद नागरे यांचा अवघ्या 'एक' मताने पराभव केला आहे. या निकालाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून, सोशल मीडियावर 'एका मताच्या ताकदी'ची चर्चा रंगली आहे.

अटीतटीची लढत अन् श्वास रोखणारी मतमोजणी 
प्रभाग १ 'अ' मध्ये एकूण १० हजार १०१ वैध मते पडली होती. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच व्यंकट डहाळे आणि प्रसाद नागरे यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळत होती. दोन्ही उमेदवारांचे समर्थक विजयाचा दावा करत होते. मात्र, जेव्हा अंतिम आकडेवारी समोर आली, तेव्हा सर्वांचेच डोळे पाणावले. उद्धवसेनेचे व्यंकट डहाळे यांना ४,३१२ मते मिळाली, तर भाजपचे प्रसाद नागरे यांना ४,३११ मते मिळाली. अवघ्या एका मताच्या फरकाने डहाळे हे विजयी घोषित झाले.

मतदारांना मिळाला मोठा धडा 
अनेकदा मतदार 'एक मत काय करणार?' म्हणून मतदानाकडे पाठ फिरवतात. मात्र, या निकालाने सिद्ध केले आहे की, लोकशाहीत एक मत कोणाचे नशीब उजळवू शकते आणि कोणाला पराभवाच्या गर्तेत टाकू शकते. जर एका मतदाराने आळस झटकून मतदान केले असते किंवा एखाद्याने मत दिले नसते, तर निकाल पूर्णपणे वेगळा असता. या निकालामुळे सध्या परभणीत विजयाचा जल्लोष सुरू असला, तरी प्रसाद नागरे यांच्या समर्थकांमध्ये मात्र एका मताच्या निसटत्या पराभवामुळे मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : One Vote Victory: Uddhav Sena triumphs in Parbhani by single vote.

Web Summary : Uddhav Sena's Vyankat Dahale won Parbhani Municipal Corporation's election by one vote, defeating BJP's Prasad Nagare. The close contest highlights the power of each vote in a democracy, sparking discussions about voter participation.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Parbhani Municipal Corporation Electionपरभणी महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६