सतरा कोटींच्या पुलांच्या कामाला मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:12 IST2020-12-27T04:12:40+5:302020-12-27T04:12:40+5:30

परभणी : तालुक्यातील विविध भागांत आ. सुरेश वरपूडकर यांच्या पाठपुराव्यातून तब्बल १७ कोटी रुपयांच्या पुलांच्या कामांना सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक ...

Approval for bridge work of Rs | सतरा कोटींच्या पुलांच्या कामाला मंजुरी

सतरा कोटींच्या पुलांच्या कामाला मंजुरी

परभणी : तालुक्यातील विविध भागांत आ. सुरेश वरपूडकर यांच्या पाठपुराव्यातून तब्बल १७ कोटी रुपयांच्या पुलांच्या कामांना सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी मंजुरी दिली आहे.

पाथरी विधानसभा मतदारसंघातील विविध गावांतील पुलांच्या कामासाठी आ. सुरेश वरपूडकर यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार मांडाखळीजवळील पुलासाठी १ कोटी २ लाख रुपये, वडगाव सुक्रे ते ब्रह्मपुरी रस्त्यावरील दोन पुलांसाठी प्रत्येकी १ कोटी ५२ लाख, ताडबोरगाव-देवलगाव अवचार ते राष्ट्रीय महामार्ग या रस्त्यावर ८० लाख, मरडसगाव- ते हदगाव- रेणाखळी रदस्त्यावर ५२ लाख, बाभळगाव ते मांडाखळी रस्त्यावर २ कोटी ३० लाख, मांडाखळी- उमरी रस्त्यावर २ कोटी, रामपुरी- थार- वांगी रस्त्यावरील पुलासाठी २ कोटी ३१ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या भागातील पुलांच्या कामांना मंजुरी मिळाल्याने ग्रामस्थांची दळणवळणाची गैरसोय दूर होणार आहे. या पुलांची कामे तातडीने करावित, अशी येथील नागरिकांची अनेक दिवसांची मागणी होती. त्यानुसार आ. सुरेश वरपूडकर यांनी पाठपुरावा करून ही कामे मंजूर करुन घेतली आहेत.

Web Title: Approval for bridge work of Rs