राष्ट्रवादीच्या सभेत चक्क अजित पवारांचीच चप्पल चोरीला जाते तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2018 10:41 IST2018-01-25T10:36:53+5:302018-01-25T10:41:05+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल संघर्षयात्रेतील पाथरी आणि सेलू येथील सभेत मंगळवारी चोरट्यांनी हात साफ केला. 9 जणांचे पाकिट आणि मोबाइल चोरीला गेले. विशेष म्हणजे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यासपीठाच्या पायरीजवळ काढून ठेवलली चप्पलही चोरट्यांनी लांबविली.

Ajit Pawar's slippers stolen during public rally | राष्ट्रवादीच्या सभेत चक्क अजित पवारांचीच चप्पल चोरीला जाते तेव्हा...

राष्ट्रवादीच्या सभेत चक्क अजित पवारांचीच चप्पल चोरीला जाते तेव्हा...

परभणी - राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल संघर्षयात्रेतील पाथरी आणि सेलू येथील सभेत मंगळवारी चोरट्यांनी हात साफ केला. 9 जणांचे पाकिट आणि मोबाइल चोरीला गेले. विशेष म्हणजे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यासपीठाच्या पायरीजवळ काढून ठेवलली चप्पलही चोरट्यांनी लांबविली. सेलू येथील सभेला अजित पवार यांच्यासह विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. व्यासपीठावर सर्व पदाधिकारी बसल्यानंतर प्रचंड गर्दी झाली होती. 

या गर्दीचा फायदा घेत अजित पवार यांनी व्यासपीठाच्या पायरीजवळ काढून ठेवलेली चप्पल चोरट्यांनी चोरली.. सभा संपल्यानंतर अजित पवार यांना आपली चप्पल चोरीला गेली असल्याचं लक्षात आलं. अखेर त्यांनी एका कार्यकर्त्याची चप्पल घातली आणि मार्गस्थ झाले. 

दरम्यान, पाथरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावरही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंगळवारी एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत उमरा येथील शेतकरी संजय बाबासाहेब कोल्हे यांचे 1 लाख 60 हजार रुपये, तसंच अन्य काहींची पाकिटे लांबविण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सभेच्या ठिकाणाहून तीन पाकिटमारांना ताब्यात घेतले.  
 

Web Title: Ajit Pawar's slippers stolen during public rally