शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

खत कंपन्यांच्या 'लिंकिंग' विरोधात एल्गार; परभणीत कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा कडकडीत बंद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 16:07 IST

१४ मागण्यांसाठी आंदोलन; परभणी जिल्हा सीड्स, फर्टीलायझर अँड पेस्टिसाइड डीलर्स असोसिएशन

-मारोती जुंबडेपरभणी: रासायनिक खतांच्या पुरवठ्यात कंपन्यांकडून केली जाणारी लिंकिंग पद्धत तात्काळ बंद करावी, या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबित प्रश्न सोडवावेत, या मागणीसाठी परभणी जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी सोमवारपासून कडकडीत बंद आंदोलन सुरू केले आहे. महाराष्ट्र फर्टीलायझर्स, पेस्टिसाइड्स अँड सीड्स डीलर्स असोसिएशनच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत आहे. 

खतांचा पुरवठा करताना कंपन्यांकडून दुकानदारांना लिंकिंग देण्यात येत असल्याने विक्रेत्यांना एमआरपीपेक्षा अधिक दराने खत खरेदी करावे लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. परिणामी, शेतकऱ्यांवरही अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याने ही पद्धत तातडीने बंद करण्याची मागणी करण्यात यावी. 

याशिवाय, शेजारील राज्यांतून येणाऱ्या अप्रमाणित कापूस बियाण्यांवर बंदी घालावी, प्रमाणित बियाण्यांसाठी साथी पोर्टलची सक्ती विक्रेत्यांऐवजी उत्पादक कंपन्यांवर करावी, खतांचा पुरवठा एफओआर पद्धतीने करावा, तसेच विक्रीवरील मार्जिन वाढवावे, अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. बियाण्यांच्या तपासणीत नमुने अपयशी ठरल्यास विक्रेत्यांना आरोपी न धरता साक्षीदार म्हणून मान्यता द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. कृषी विभागाकडून गुणवत्ता तपासणीसाठी घेतलेल्या नमुन्यांच्या प्रलंबित रकमा तातडीने अदा कराव्यात, तसेच मुदतबाह्य कीटकनाशके कंपन्यांनी परत घ्यावीत, अशा मागण्यांचाही यात समावेश आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी कृषी दुकानदारांनी प्रशासनाला निवेदन सादर केले. 

आंदोलनात रमेश देशमुख, अनुप गुप्ता, बाळासाहेब चोपडे, संतोष हराळे, प्रसाद आरमळ, गोपाळ सावरे, शिवाजी चिंचाने, प्रवीण जाधव, राजेंद्र अग्रवाल, अक्षय अग्रवाल, ज्ञानोबा शिंदे यांच्यासह परभणी जिल्हा सीड्स, फर्टीलायझर अँड पेस्टिसाइड डीलर्स असोसिएशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Parbhani Agri-Input Dealers Protest 'Linking'; Complete Shutdown Against Fertilizer Companies

Web Summary : Parbhani's agri-input dealers initiated a complete shutdown, led by the Maharashtra association, protesting fertilizer companies' 'linking' practices that force dealers to buy fertilizers above MRP. They demand an end to this practice and other concessions, including banning uncertified seeds.
टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रparabhaniपरभणीFarmerशेतकरी