रस्त्यावर उभ्या जेसीबीवर धडकल्याने दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2022 16:18 IST2022-10-24T16:17:19+5:302022-10-24T16:18:31+5:30
रस्त्यावर उभ्या जेसीबी वाहनावर दुचाकी धडकली.

रस्त्यावर उभ्या जेसीबीवर धडकल्याने दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू
मानवत (परभणी) : शेतातून घरी परतत असताना रस्त्यावर उभ्या जेसीबीवर धडकल्याने दुचाकीवरील तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे रामेटाकळी येथे घडली. विठ्ठल लक्ष्मण काळे ( ३२ , रामेटाकळी ) असे मृताचे नाव आहे.
तालुक्यातील रामेटाकळी येथील विठ्ठल लक्ष्मण काळे आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास शेतातून घराकडे निघाला होता. रामेटाकळी शिवारातून विठ्ठल दुचाकीवरून ( एमएच 05 डब्ल्यू 767 ) गावाकडे निघाला. अर्धा किमी अंतर पार केले असता रस्त्यावर उभ्या जेसीबी वाहनावर दुचाकी धडकली. यात विठ्ठलचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच सपोनि फेरोज पठाण, आनंद बनसोडे, बीट जमादार उद्धव माने, विष्णू चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. सकाळी साडेनऊ वाजता रामपुरी येथील आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले.